शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ७ जागांसाठी २४ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:54 IST

जिल्हा वकील संघाच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २४ इच्छुकांनी ३१ अर्जांद्वारे उमेदवारी दाखल केली. तर तीन जणांचे अर्ज बाद झाले.

बीड : जिल्हा वकील संघाच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २४ इच्छुकांनी ३१ अर्जांद्वारे उमेदवारी दाखल केली. तर तीन जणांचे अर्ज बाद झाले.येत्या ६ आॅगस्ट रोजी जिल्हा वकील संघाची निवडणूक होत आहे. ८०३ सदस्य मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. दिनेश गोवर्धन हंगे व अ‍ॅड. राजेश आर्सूळ यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. उपाध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. रामेश्वर चाळक, अ‍ॅड. सुरेश कुलकर्णी, अ‍ॅड. मोहताबसिब ताहेरुद्दीन नसिमोद्दीन (नुर), अ‍ॅड. शेख इमरान आय्युब पटेल, अ‍ॅड. सईद खुर्शीद देशमुख, सचिव पदासाठी अ‍ॅड. अभिषेक जोशी यांचे दोन अर्ज तर अ‍ॅड. रामेश्वर चाळक, अ‍ॅड. भाऊसाहेब लटपटे, अ‍ॅड. श्रीकांत जाधव, अ‍ॅड. रंजीत करांडे, अ‍ॅड. शेख इमरान अय्युब पटेल, अ‍ॅड. किशोर कसबे यांनी उमेदवारी दाखल केली. सहसचिव पदासाठी अ‍ॅड. सय्यद यासेर सय्यद नबी पटेल यांचे दोन तर अ‍ॅड. किशोर कसबे यांचा अर्ज दाखल झाला आहे. कोषाध्यक्षपदासाठी रणजित वाघमारे यांचेच दोन अर्ज दाखल आहेत. ग्रंथपाल सचिव पदासाठी अ‍ॅड. कृष्णा नवले यांचे दोन अर्ज अ‍ॅड. मनोज अंकुशे, अ‍ॅड. शेख इमरान खाजा, अ‍ॅड. धनराज शशिकांत जाधव, अ‍ॅड. विलास फाटक यांची उमेदवारी दाखल झाली आहे. महिला प्रतिनिधी म्हणून अ‍ॅड. बबिता पळसेकर आणि अ‍ॅड. संगीता भुतावळे यांचे प्रत्येकी दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. बालाप्रसाद करवा यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडadvocateवकिलElectionनिवडणूक