शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पोटगीचा अडीच वर्षांचा संघर्ष, ४ तासांत न्यायालयाने संपवला; पतीस सुनावली कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 19:54 IST

वेळोवेळी न्यायालयाने त्यास वॉरंट बजावणी केली, परंतु त्याने दुर्लक्ष केले. न्यायालयीन सुनावणीवेळी तो हजर राहत नसे.

बीड : लग्नानंतर एकमेकांचे पटत नसल्याने रीतसर फारकत घेतलेल्या पतीने पत्नीला महिन्याकाठी २७०० रुपये पोटगी दिली नाही, त्यामुळे पत्नीने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यावर शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत त्यास उचलले व न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची तब्बल ६२ दिवसांसाठी कारागृहात रवानगी केली. ६ डिसेंबरला कौटुंबिक न्यायालयाचे न्या. मकरंद अदवंत यांनी हे आदेश दिले.

शेख शारेब शेख सादेक (वय ३१, रा. शहेंशाहनगर, बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे. व्यवसायाने मेेकॅनिक असलेल्या शेख शारेब याने पत्नी निखत फातेमाशी फारकत घेतली होती. निखत फातेमा या कमावत्या नव्हत्या. गुजराण करण्यासाठी महिन्याकाठी शेख शारेब याने २७०० रुपये पोटगी द्यावी, असे आदेश यापूर्वी न्यायालयाने दिले होते. मात्र, ३१ महिन्यांपासून शेख शारेब हा पोटगी देत नव्हता. एकूण ८४ हजार ५०० रुपये त्याच्याकडे थकीत आहेत. दरम्यान, पोटगी मिळावी, यासाठी निखत फातेमा यांनी कौटुंबिक न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

या दरम्यान, वेळोवेळी न्यायालयाने त्यास वॉरंट बजावणी केली, परंतु त्याने दुर्लक्ष केले. न्यायालयीन सुनावणीवेळी तो हजर राहत नसे. त्यामुळे ६ डिसेंबरला न्या. मकरंद अदवंत यांनी त्याच्याविरुध्द अटक वॉरंट जारी केले. दरम्यान, निखत फातेमा या आपल्या आईसोबत ६ डिसेंबरला शिवाजीनगर ठाण्यात कैफियत घेऊन आल्या. त्यानंतर पो. नि. केतन राठोड यांनी अंमलदार आस्तीक लादेक व विकास कांदे यांना रवाना केले. या दोघांनी तपासचक्रे गतिमान करून शेख शारेब यास शहेंशाहनगरातून ताब्यात घेतले. त्यास लगेचच कौटुंबिक न्यायालयात हजर केले. न्या. मकरंद अदवंत यांनी त्यास ६२ दिवस कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.

अडीच वर्षांचा संघर्ष, चार तासांत न्यायशेख शारेब हा अडीच वर्षांपासून पत्नीला पोटगी देत नव्हता. न्यायालयीन नोटीस व वॉरंटकडेही तो दुर्लक्ष करत असे. ६ डिसेंबरला न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यावर निखत फातेमा या आईसमवेत पोलीस ठाण्यात आल्या. शिवाजीनगर ठाण्याचे पो. नि. केतन राठोड यांनी त्यांची कैफियत जाणून घेत धीर देण्याचा प्रयत्न केला; त्यानंतर दोन अंमलदारांना रवाना करून न्यायालयात हजर केले. त्यामुळे अडीच वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या निखत फातेमाला अवघ्या चार तासांत न्याय मिळाला. पोलिसांनी तत्परतेने प्रतिसाद दिल्यामुळे माय-लेकी केतन राठोड यांचे आभार मानायला विसरल्या नाहीत.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालय