जिल्ह्यात शुक्रवारी ४ हजार ८५ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १८८ पॉझिटिव्ह, तर ३ हजार ८९७ जण निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये आष्टी तालुक्यात सर्वाधिक ८१, अंबाजोगाई ६, बीड ३०, धारुर ६, गेवराई २१, केज १५, माजलगाव २, पाटोदा १७, शिरुर व वडवणी तालुक्यातील प्रत्येकी पाच रुग्णांचा समावेश आहे.
तसेच जिल्ह्यात २४ तासांतील १ व जुन्या १ अशा एकूण २ मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. २४ तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये केकतपांगरी (ता. गेवराई) येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एकूण मृत्यूचा आकडा २ हजार ५५६ झाला आहे. तसेच एकूण बाधितांची संख्या ९३ हजार ४३१ इतकी झाली असून, यापैकी ८९ हजार ८१७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १ हजार ५८ रुग्ण उपचार घेत आहेत.