शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील १,८३९ मुले कोल्हापूरच्या फडात; ‘लोकमत’च्या बातमीवर सुमोटो याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 05:38 IST

उलट तपासणीमध्ये ही मुले बीडमधील शाळेच्या हजेरीपटावर उपस्थित असल्याचे उघड झाले होते.

सोमनाथ खताळ

बीड : बीड जिल्ह्याच्या विविध भागातील ० ते १८ वयोगटातील तब्बल १,८३९ मुले कोल्हापूरच्या वेगवेगळ्या ११ कारखान्यांवर ऊसतोडणी काम करणाऱ्या पालकांसोबत होती. ही बाब कोल्हापूरच्या ‘अवनी’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाली होती. उलट तपासणीमध्ये ही मुले बीडमधील शाळेच्या हजेरीपटावर उपस्थित असल्याचे उघड झाले होते.

    बीड शिक्षण विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे तत्त्वशील कांबळे आणि जागर प्रतिष्ठानचे अशोक तांगडे यांनी यासंदर्भात काही शाळांची तपासणीदेखिल केली होती. हाच प्रकार  ‘लोकमत’ने १२ मार्च आणि २४ मार्च २०२४ रोजी वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणला होता. याचीच दखल घेत मानवी हक्क आयोगाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. यावर आता ३१ जुलै रोजी एक सुनावणी झाली असून पुढील सुनावणी ही २६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

यांना केली पार्टी

याचिकेत प्रधान सचिव शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यात पार्टी करण्यात आले आहे.

अवनी संस्थेने पाठविलेल्या यादीची उलट तपासणी केली होती. तीन शाळांना भेटी दिल्यावर ही मुले कोल्हापूरमध्ये असतानाही त्यांची हजेरी बीडमध्ये असल्याचे दिसले होते. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा करण्यात आली.  

- तत्त्वशील कांबळे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान, बीड

कोल्हापूरमध्ये ८० टक्के ऊसतोड मजूर हे बीड जिल्ह्यातील येतात. त्यांच्या मुलांचे सर्वेक्षण केले होते. त्याची उलट तपासणी केल्यावर अनेक धक्कादायक माहिती समोर आल्या.

- अनुराधा भोसले, अध्यक्षा, अवनी संस्था, कोल्हापूर