शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये १५० ब्रास वाळू साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:21 IST

मागील आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यातील अवैध वाळू साठ्यावर धाडसत्र सुरू आहे. शनिवारी बीड शहरातील उत्तमनगर भागाच्या पश्चिमेला दीडशे ब्रास वाळू साठ्यावर अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या पथकाने छापा टाकला.

बीड : मागील आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यातील अवैध वाळू साठ्यावर धाडसत्र सुरू आहे. शनिवारी बीड शहरातील उत्तमनगर भागाच्या पश्चिमेला दीडशे ब्रास वाळू साठ्यावर अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या पथकाने छापा टाकला. वाळूचा साठा करेपर्यंत गौण खनिज विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासन व पोलीस काय करत होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पकडलेली वाळू शासकीय विश्रामगृह परिसरात साठवली जात आहे. महिनाभरापूर्वी राजापूर येथील पकडलेली वाळू बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात साठवून ठेवली आहे.वसंत बबनराव कदम यांच्या मालकीची दीडशे ब्रास वाळू बीड शहरातील उत्तमनगरच्या पश्चिमेला साठवून ठेवली असल्याबाबतची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकातील संतोष बन, नितीन जोगदंड, सचिन सानप यांनी त्या दीडशे ब्रास वाळू साठ्यावर छापा टाकला. पकडलेली वाळू बीड शहरातील शासकीय विश्रामगृहात वाहून आणण्यात आली. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे. ज्या जागेत वाळू ठेवली होती ती जागा देखील वसंत बबनराव कदम यांच्याच नावावर असल्याचे महसूल विभागातील पथकातील अधिकारी यांनी सांगितले. वाळू साठ्यांवर छापा टाकण्यासाठी पथके तयार केली असली तरी वाळू प्रकरणात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शेकडो ब्रास वाळू साठवेपर्यंत जिल्हा प्रशासनाने काय केले? असा सवालही आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

टॅग्स :BeedबीडsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग