बीड : जिल्ह्यात गुरूवारी नवे १०३ रुग्ण निष्पन्न झाले. तर १३४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. मागील २४ तासांत दोन रूग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ९२ हजार १२९ कोरोना बाधित आढळले असून २,५०४ जणांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी ३ हजार ८५८ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल गुरूवारी प्राप्त झाले. यात १०३ रूग्ण पॉझिटिव्ह तर ३ हजार ७५५ जणांचे नमुने निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये आष्टी तालुक्यात २१, अंबाजोगाई ४, बीड ११, धारुर ११, गेवराई १५, केज ७, माजलगाव ६, परळी २, पाटोदा १७, शिरुर ४ व वडवणी तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ४४ हजार ५९९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. ५ लाख ५२ हजार ४७० नमुने निगेटिव्ह आढळले. बाधितांची संख्या ९२ हजार १२९ इतकी झाली असून, यापैकी ८८ हजार ४२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्यू दर २.७१ टक्के तर पॉझिटिव्हिटी रेट १४.२९ टक्के आहे. एकूण बळींचा आकडा २ हजार ५०४ इतका झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार १९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.