शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

१३ कामचुकार डॉक्टरांचे वेतन कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:05 IST

जिल्हा रूग्णालयात शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी अचानक वॉर्डमध्ये जावून तपासणी केली. यावेळी तीन दिवसात तब्बल १३ डॉक्टरांनी कामचुकारपणा करीत रूग्णांची वेळेवर तपासणी न केल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्देकारवाई : रूग्णांची वेळेवर तपासणी न करणे अंगलट

बीड : जिल्हा रूग्णालयात शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी अचानक वॉर्डमध्ये जावून तपासणी केली. यावेळी तीन दिवसात तब्बल १३ डॉक्टरांनी कामचुकारपणा करीत रूग्णांची वेळेवर तपासणी न केल्याचे उघड झाले आहे. या सर्व कामचुकारांचे वेतन कपात करण्यात आले आहे. काही मुजोर डॉक्टर आजही रूग्णांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.जिल्हा रूग्णालयात शरीक (अ‍ॅडमिट) असलेल्या रूग्णांची तपासणी सकाळी १० वाजेपर्यंत तर सायंकाळी ६ करणे अपेक्षित आहे. मात्र, काही डॉक्टर वॉर्डमध्ये जावून रूग्णांची तपासणीच करीत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावर मागील तीन दिवसांपासून स्वता: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये जावून तपासणी केली असता सोमवारपर्यंत १३ डॉक्टरांनी राऊंड घेतला नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर तात्काळ वेतन कपातीची कारवाई झाली.दरम्यान, यातील पाच ते सहा डॉक्टर हे नेहमीच कामचुकारपणा करीत असल्याचे समोर आलेले आहे. त्यांच्यावर कारवाई करूनही सुधारणा होत नसल्याचे सांगितले. याचा परिणाम सेवेवर होत असून रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा कामचुकार डॉक्टरांची हकालपट्टी करावी, अशी मागणी रूग्ण व नातेवाईकांमधून होत आहे.दलालांमार्फत रूग्णांची पळवापळवीकारवाई झालेल्या १३ पैकी जवळपास १० डॉक्टरांचे खाजगी रूग्णालये आहेत. जिल्हा रूग्णालयातील रूग्णांकडे दुर्लक्ष करून खाजगी रूग्णालयात आलेल्या रूग्णांवर ते उपचार करतात. काही डॉक्टरांकडून येथील रूग्णांची दलालांमार्फत पळवापळव होत असल्याचे समोर आले आहे.हे दलाल रूग्णांच्या मनात भिती घालून त्यांना बाहेर नेत असल्याचे मागील काही प्रकरणातून समोर आले होते. हे प्रकार बंद करून सरकारी रूग्णालयातच उपचार करावेत, अशी मागणीही सर्वसामान्यांमधून होतआहे.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडdoctorडॉक्टर