शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेहुणीवर अत्याचार प्रकरणी १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:54 IST

बीड : अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लक्ष्मण सुदाम तोगे (रा. मुंडेवाडी, ता. केज) यास दोषी ठरवून १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी १८ जून रोजी सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. भागवत एस. राख यांनी काम ...

बीड : अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लक्ष्मण सुदाम तोगे (रा. मुंडेवाडी, ता. केज) यास दोषी ठरवून १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी १८ जून रोजी सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. भागवत एस. राख यांनी काम पाहिले.

५ सप्टेंबर २०१७ रोजी बीड तालुक्यातील तांदळ्याची वाडी येथील अल्पवयीन मेहुणीला तुझ्या आईने नांदूर येथे धान्य घेतले आहे. तिला ते ओझे झेपत नाही. आपण घेऊन येऊ, असे बोलून बरडफाटा परिसरातील सेंद्रीच्या पिकामधून जाताना लक्ष्मण याने बळजबरीने गोळी खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

सदर पीडित मुलगी, आई - वडिल व इतर नातेवाईकांनी तक्रार न दिल्यामुळे सरकार पक्षाच्या वतीने नेकनूर पोलीस ठाण्यात महिला पोलीस नाईक आशा चौरे यांच्या फिर्यादीवरुन बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नेकनूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी या प्रकरणात सखोल तपास करुन आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. याप्रकरणात पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय पुरावा व इतर पुराव्याचे अवलोकन करुन तसेच सहायक सरकारी वकील अ‍ॅड. राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी लक्ष्मण सुदाम तोगे यास कलम ३७६ प्रकरणी दोषी ठरवून १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

अ‍ॅड. राख यांना जिल्हा सरकारी वकील अजय राख, सहायक सरकारी वकील अनिल तिडके, आर. बी. बिरंगळ, ए. पी. हसेगावकर, एस. व्ही. सुलाखे यांनी तसेच या प्रकरणी पैरवी अधिकारी सी. ए. इंगळे व पोलीस कर्मचारी पालवे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालयMarathwadaमराठवाडा