शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा रुग्णालयाला मिळणार १२ मल्टीपॅरा मॉनिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:51 IST

राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या माध्यमातून येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागासाठी १२ मल्टीपॅरा मॉनिटर लवकरच उपलब्ध होणार आहेत.

ठळक मुद्देचांगल्या कार्यासाठी वाढतोय लोकसहभाग : राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या माध्यमातून येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागासाठी १२ मल्टीपॅरा मॉनिटर लवकरच उपलब्ध होणार आहेत.शासकीय संस्था जर चांगल्या पद्धतीने काम करत असतील तर लोकसहभागही वाढत जातो. मागील एक वर्षापासून बीडचे जिल्हा रुग्णालय कात टाकत आहे. येथे रुग्णांना पुरेशी वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून आवश्यक सुविधा शासनपातळीवर आणि लोकसहभागातून उपलब्ध केल्या जात आहेत. जिल्हा रुग्णालयातील आयसीयू कक्ष अद्ययावत करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात प्रयत्नशील आहेत. चर्चेनंतर सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांनी स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अवघ्या काही दिवसातच नवरात्रमध्ये जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागात १२ बेड उपलब्ध केले.शुक्रवारी परळीत वैद्यनाथ देवस्थानच्या डायलेसिस सेंटरमध्ये जर्मन तंत्रज्ञानाची मेडिकल केअर मशीन राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी उपलब्ध करुन दिली. मशीन लोकार्पण कार्यक्रमात डिगे यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी राज्य धर्मादाय आयुक्त डिगे यांच्याशी चर्चा केली. तसेच भाषणात बीड जिल्हा रुग्णालयातील कामांची व आरोग्य सेवा सुविधांची माहिती देत डॉ. थोरात यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागासाठी मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा केली. हाच धागा पकडून आयुक्त डिगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सविस्तर चर्चेअंती डिगे यांनी मदतीची ग्वाही दिली. १२ मल्टीपॅरा मॉनिटर देण्याचे सूचक संकेत दिले. राज्य धर्मादाय आयुक्तांच्या पुढाकारातून धर्मादाय संस्थांच्या मदतीने बीड जिल्ह्यात दोन सामूहिक विवाह सोहळे पार पडले तसेच गणेश मंडळ व संस्थाच्या माध्यमातून सामाजिक आधाराचे मोठे काम झालेले आहे. बीडसाठी त्यांची मदत मोलाची ठरणार आहे.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड