शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

११५ ‘गोंधळीं’वर पोलिसांचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:34 IST

२०१४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांत गोंधळ घातल्यामुळे तब्बल ४१ गुन्हे दाखल होते. यामध्ये ११५ आरोपींचा समावेश होता. या आरोपींचा पुन्हा ‘बायोडाटा’ तयार केला आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : प्रतिबंधात्मक कारवायांना सुरुवात; आरोपींच्या याद्याही केल्या तयार

बीड : २०१४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांत गोंधळ घातल्यामुळे तब्बल ४१ गुन्हे दाखल होते. यामध्ये ११५ आरोपींचा समावेश होता. या आरोपींचा पुन्हा ‘बायोडाटा’ तयार केला आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया तर केल्या जाणारच आहेत, शिवाय ते पोलिसांच्या रडारवर असणार आहेत.मागील वेळेसच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत गोंधळ होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियोजन केले होते. मात्र तरीही काही उपद्रवींनी आचारसंहितेचा भंग करण्याबरोबरच इतर कारनामे केले. त्यानंतर पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. याच गुन्हेगारांचा पुन्हा बायोडाटा काढणे सुरू केले आहे. बीड पोलिसांनी याची माहिती घेतली असता जिल्ह्यात निवडणूक काळात तब्बल ४१ गुन्हे दाखल झाले असून ११५ आरोपी आहेत. यामध्ये लोकसभेचे २४ गुन्हे आणि ६९ आरोपी तर विधानसभेचे १७ गुन्हे आणि ८६ आरोपी आहेत.निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, यासाठी नियोजन केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी सांगितले. यासाठी विशेष पथकेही नियुक्त केल्याचे पाळवदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.किरकोळ वाद आले अंगलटकट्टर समर्थक म्हणून नेत्याला दाखविण्यासाठी अनेकजण उत्साही असतात. मात्र हाच उत्साह कार्यकर्त्यांच्या अंगलट येतो. काही तरी अनुचित प्रकार घडतो आणि पोलीस दप्तरी नावाची नोंद होते. त्यानंतर वारंवार न्यायालय आणि निवडणूक काळांत पोलीस ठाण्यांचे उंबरे झिजवावे लागतात. निवडणूक काळात किरकोळ वादच कार्यकर्त्यांच्या अंगलट येत असल्याचे दाखल गुन्ह्यांवरून स्पष्ट झाले आहे.यांनी केले गंभीर गुन्हेनिवडणूक काळात शारीरिक इजा करणाऱ्या गुन्ह्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. गंभीर आणि दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची संख्या ४०८ आहे.त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे विशेष शाखेचे पो.नि. हेमंत मानकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीस