शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

मोठा दिलासा! अन्न परवाना नुतनीकरणासाठी व्यापाऱ्यांना येणार रिमाइंडर मेसेज

By अनिल भंडारी | Updated: July 27, 2023 13:29 IST

देशभरातील व्यापाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार : भूर्दंड टळणार

बीड : अन्न भेसळ सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना नुतनीकरणास विलंब झाल्यास दररोज शंभर रुपये दंड आकारला जात होता. याबाबतच्या नियमात सुधारणा करण्याची मागणी होती. दरम्यान आता परवाना नुतनीकरणासाठी पूर्वकल्पना देणारा संदेश मोबाईलवर पाठवला जाणार असून याची अंमलबजावणीही नुकतीच  सुरु झाली आहे.

अन्न परवान्याचे नुतनीकरण वेळेत न झाल्यास प्रतिदिन १०० रुपयांप्रमाणे विलंब शुल्क आकारले जाते. या शुल्काबाबत फेरविचार करुन नियमात बदल करावा अशा मागणीचे निवेदन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारत पवार यांना बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष अशोक शेटे यांनी नवी दिल्ली येथे भेटून दिले होते. यावेळी व्यापाऱ्यांना नुतनीकरण करण्याच्या एक महिना अगोदर मेसेजद्वारे अग्रीम सूचना दिली जाईल, यामुळे व्यापाऱ्यांना नाहक भुर्दंड लागणार नाही, असे आश्‍वासन पवार यांनी दिले होते. या निर्णयाची देशभरात तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून आता परवाना नुतनीकरणासाठीचे मेसेज व्यापाऱ्यांना येत आहेत.

व्यापाऱ्यांनी वेळेत नुतनीकरण करावेआता प्रत्येक अन्न परवानाधारक व्यापाऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये टेक्स्ट मेसेज तपासणे गरजेचे आहे. ज्यांना अन्न परवाना नुतनीकरण करणे गरजेचे आहे, त्यांना नुतनीकरणाचा संदेश AX-EFSSAI वरुन येणार आहे. हा परवाना वेळेत नुतनीकरण केल्यास दंड द्यावा लागणार नाही. या प्रश्‍नावर पाठपुराव्यासाठी आरोग्य राज्यमंत्र्यांचे सहाय्यक सचिव डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी संहकार्य केले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी तातडीने प्रश्‍न सोडवला, असे व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष अशोक शेटे आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागfoodअन्नBeedबीड