शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेकडून जिल्हा रुग्णालयास १०० ऑक्सिजन जम्बो सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:14 IST

लोकसहभाग : अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा सहभाग, ५७ सिलिंडर दिले, ४३ देणार बीड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, सर्व पदाधिकारी, ...

लोकसहभाग : अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा सहभाग, ५७ सिलिंडर दिले, ४३ देणार

बीड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य सर्व अधिकारी तसेच जिल्हा परिषदेशी संलग्न अभियंत्यांनी लोकसहभागातून बीड जिल्हा रुग्णालयास १०० ऑक्सिजन जम्बो सिलिंडर देण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार रविवारी ५७ जम्बो सिलिंडर जिल्हा रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले आहेत. तर उर्वरित ४३ सिलिंडरदेखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.

पालकमंत्री धनंजय मुंडे, जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, जि. प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून ही बाब साकारली आहे. शासकीय आयटीआय येथेही आणखी एक कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे, त्यासाठीही या सिलिंडरचा उपयोग होणार आहे.

एकीकडे रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा आहे तर दुसरीकडे विविध जनरेशन प्लांटवर तसेच आयात केलेल्या ठिकाणी ऑक्सिजन भरून ठेवण्यासाठी सिलिंडर कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत हे ५७ जम्बो सिलिंडर निश्चितच आरोग्य यंत्रणांसाठी फायदेशीर ठरणार आहेत, आणखी ४३ जम्बो सिलिंडर लवकरच उपलब्ध करून देऊ; असे जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी सांगितले.

जिल्हा परिषद प्रांगणात शनिवारी हे ५७ जम्बो सिलिंडर जिल्हा रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले, यावेळी जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, महिला व बालकल्याण समिती सभापती यशोदाताई जाधव, कृषी व पशु संवर्धन समिती सभापती सविताताई मस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, शिवाजीराव सिरसाट, बाळासाहेब मस्के, जि.प. सदस्य अशोक लोढा, विठ्ठल थडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, रामेश्वर मुंडे, भागवत औताडे, रणजित क्षीरसागर आदी उपस्थित होते.

===Photopath===

020521\194502_2_bed_32_02052021_14.jpeg

===Caption===

जिल्हा परिषदेकडून जिल्हा रुग्णालयास १०० ऑक्सिजन जम्बो सिलिंडर