शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

४२ हजार शौचालयांचा घोळ मिटेना; निधी परत जाणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 00:00 IST

जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय सुविधा असावी अशा सूचना केंद्र शासनाने दिल्या असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

ठळक मुद्देसीईओंचा इशारा : सहा तालुक्यांतील ग्रामसेवक, कर्मचाऱ्यांना इशारा

बीड : जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय सुविधा असावी अशा सूचना केंद्र शासनाने दिल्या असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र, अजूनही जवळपास ४२ हजार कुटुंबांना अनुदान उपलब्ध करून दिले नसल्याच्या नोंदी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर असल्याने या शौचालयाचा घोळ अद्याप मिटलेला नसून, निधी परत जाण्याची भीती आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत सर्व कुटुंबांना शौचालय सुविधा उपलब्ध करून द्यावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा इशारा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिला.१०० पेक्षा जास्त कुटुंबे शिल्लक ठेवलेल्या आष्टी, शिरूर, गेवराई, माजलगाव, बीड व केज तालुक्यातील सुनावणी व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे उपस्थित होते. यावेळी सीईओ कुंभार म्हणाले, जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर अतिरिक्त स्वच्छाग्रहींची नेमणूक करून त्यांच्यामार्फत गृहभेटी घ्याव्यात तसेच ग्रामसेवकांनी मुख्यालयी थांबून शौचालय बांधकामासाठी पाठपुरावा करावा. बांधकामे पूर्ण झालेल्या शौचालयाचे प्रस्ताव तात्काळ पंचायत समितीस उपलब्ध करावेत. संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन दिवसात निधी वितरीत होईल याची खबरदारी पंचायत समिती स्तरावरील कर्मचाऱ्यांनी घ्यावी. दिरंगाई करणाºया संबंधित कर्मचाºयांनी कारवाईला तयार रहावे असा सज्जड दम ग्रामसेवकांसह कर्मचाºयांना दिला. या सुनावणीत सहा तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.सुविधा द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जाही बांधकामे ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने शेवटची मुदत दिलेली आहे. यानंतर होणाºया बांधकामांना निधी मिळणार नाही उर्वरित निधी केंद्र शासन परत घेणार असल्याने लाभार्थी वंचित राहिल्यास याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे.