शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमद्वारे लंपास केले १ लाख २० हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:32 IST

येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील एटीएम मध्ये एका ६५ वर्षीय पेन्शन धारकाची अज्ञात व्यक्तीने फसवणूक करत एटीएमद्वारे तब्बल १ लाख १९ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगेवराई येथील घटना : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील एटीएम मध्ये एका ६५ वर्षीय पेन्शन धारकाची अज्ञात व्यक्तीने फसवणूक करत एटीएमद्वारे तब्बल १ लाख १९ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमाकांत भगवानराव हुलजुते (वय ६५ रा.शारदा शाळेजवळ, ताकडगाव रोड, गेवराई) हे जयभवानी सहकारी साखर कारखाना येथे लिपिक म्हणून या पदावरून निवृत्त झालेले आहेत. त्यांना मिळणारी पेन्शन त्यांचे गेवराई येथील मोंढा भागातील स्टेट बँक आॅफ इंडिया या शाखेत बचत खाते क्रमांक ३१२५००१०८१८ यामध्ये १ लाख ३७ हजार ६०० रुपये रक्कम जमा होती. दरम्यान हुलजुते यांनी २२ नोव्हेंबर रोजी स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील एटीएम मध्ये जाऊन ५०० रुपये रक्कम काढली. यानंतर ते २३ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या दिवशी एटीएममध्ये पुन्हा पैसे काढण्यासाठी गेले असता एटीएममधून रक्कम निघाली नाही. यामुळे हुलजुते यांनी त्यांच्या मुलाला याची माहिती दिली असता त्यांने बँकमध्ये माहिती घेतली असता २२ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४७ वा. १९ हजार ५०० रुपये, ११.५० वा. ४० हजार, १२.०३ मि. २० हजार आणि १२.०४ मि. ४० हजार असे एकूण १ लाख १९ हजार ५०० रक्कम काढल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी खात्यावरील रक्कम गायब असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. दरम्यान यावेळी बँक व्यवस्थापक यांनी तुमचे एटीएम कार्ड क्लोनिंग करुन फसवणूक केली असल्याचे सांगितले. दरम्यान हुलजुते यांनी आपली फसवणूक झाल्याने त्यांनी ठाण्यात जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी रमाकांत हुलजुते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे करत आहेत.गेवराईच्या एसबीआय शाखेतील प्रकारयेथील सेवानिवृत्त रमाकांत हुलजते यांच्या खात्यातील १ लाख ३७ हजार ६०० रुपये रक्कम लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने बँकेत जाऊन विचारणा केली असता कार्डचे क्लोनिंग करुन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.

टॅग्स :BeedबीडatmएटीएमCrime Newsगुन्हेगारी