शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

​रोज व्यायाम न केल्यामुळे जगाचे होते ४.५ हजार कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 22:45 IST

५३.८ बिलियन डॉलर्स विविध आरोग्य समस्या उपचारांवर तर त्यामुळे घटलेल्या उत्पादकतेमुळे १३.७ बिलियन डॉर्सचा भुर्दंड सहन करावा लागला.

वाचून आश्चर्य वाटले ना? अहो पण ते खरं आहे. आईवडिल, डॉक्टर कितीही ओरडून सांगत असले तरी आपला सकाळी उठण्याचा कंटाळा काही जाणार नाही. पण असे करणे केवळ आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे असे नाही.संशोधकांच्या एका गटाने केलेल्या अध्ययनानुसार रोजच्या रोज व्यायाम न केल्यामुळे उद्भवणाºया आरोग्य समस्यांवर २०१३ साली संपूर्ण जगाचे ६७.५ बिलियन डॉलर्स (४५२२ कोटी रु.) खर्च झाले.यांपैकी ५३.८ बिलियन डॉलर्स विविध आरोग्य समस्या उपचारांवर तर त्यामुळे घटलेल्या उत्पादकतेमुळे जगाला १३.७ बिलियन डॉर्सचा भुर्दंड सहन करावा लागला, अशी माहिती ‘द लॅन्सेट’ नावाच्या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित लेखात देण्यात आली आहे. ‘नॉर्वेयन स्कूल आॅफ स्पोर्टस् सायन्सेस’द्वारे १४२ देशांतून सुमारे ९३ टक्के जागतिक लोकसंख्येची माहिती गोळा करून तिच्या अभ्यासाअंती हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.संशोधनामध्ये केवळ - हृदयविकार, स्ट्रोक, टाईप २ मधुमेह, स्तन कॅन्सर आणि आतड्याचा कॅन्सर - या पाच प्रकारच्या आजारांचा सामावेश करण्यात आला होता. यावर होणाऱ्या खर्चाची आकडेवारी ही मर्यादित अंदाजावर आधारित असून प्रत्यक्षात यापेक्षा किती जास्ता खर्च होत असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली. पुरेशी शारीरिक हालचाल न करण्याच्या जीवनशैलीमुळे दरवर्षी जगात ५० लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या सल्ल्यानुसार आठवड्यातून किमान १५० मिनिटे व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.