(Image Credit : www.femina.in)
केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी मेहंदीचा वापर पुन्हा एकदा चलनात आला आहे. कारण मेहंदीच्या वापराने केस सुरक्षित होतात. केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी मेहंदीचा वापर प्राचीन काळापासून केला जातो. पण अनेकजण मेहंदीमुळे केस रखरखीत झाल्याची तक्रार करतात. पण काही नैसर्गिक पदार्थ केसांची चमक वाढवण्यासाठी आणि मुलायम करण्यासाठी फायदेशीर ठरतात. चला जाणून घेऊ केसांचं सौंदर्य आणखी चांगलं ठेवण्यासाठी मेहंदीमध्ये काय मिश्रित करावं.
१) बीट
बीटाच्या रसात भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आणि पाणी असतं. जे केसांना हायड्रेट ठेवतात आणि केस याने कोरडे किंवा सुष्क होत नाहीत. बीट उकडून मेहंदीमध्ये टाकल्यास केसांना नैसर्गिक रंग मिळतो, ज्याने केसांचं सौंदर्य अधिक वाढतं.
२) अंड्यातील पांढरा भाग
केस मुलायम करण्यासाठी अंड्यातील पांढरा भाग मेहंदीमध्ये मिश्रित करा. अंड्यातील प्रोटीन केसांना चमकदार आणि सुंदर करतात. त्यामुळे याचा वापर फायदेशीर ठरतो.
३) लिंबाचा रस
लिंबात व्हिटॅमिन सी असतं जे केसांना रखरखीत किंवा सुष्क होण्यापासून रोखतं. लिंबाचा रस मेहंदीमध्ये मिश्रित करून केसांना लावला तर केस निरोगी आणि मुलायम होतात.
४) ऑलिव ऑइल
ऑलिव ऑइलमधील फॅट्स केसांना पोषण देतात आणि केसांचा रखरखीतपणा दूर करतात. केसांचं सुष्क होणं रोखण्यासाठी मेहंदीमध्ये ऑलिव ऑइल मिश्रित करा. याने केसांना चांगला फायदा होईल.
५) मेथी
मेथी पावडर मेहंदीमध्ये टाकून भिजवा. ही मेहंदी केसांना लावा. मेथीच्या पावडरमध्ये भरपूर प्रोटीन असतं. जे डोक्याच्या त्वचेला इन्फेक्शन होण्यापासून रोखतं. तसेच याने केस मजबूत आणि मुलायम होता.
(टिप : वरील लेखातील उपाय हे माहिती म्हणून देण्यात आले आहेत. ते वापरण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण काहींना यातील गोष्टी सूट होतीलच असं नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपाय फॉलो केले तरच फायदा होईल.)