शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

​सेलिब्रिटींसारखे गुलाबी ओठ हवे आहेत? थंडीत अशी घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

ऋतूमानाचा परिणाम आपल्या ओठांवर दिसून येतो. हिवाळ्यात तर ओठाच्या बऱ्याच समस्या निर्माण होतात.

आपण नेहमी पाहत असतो की, प्रत्येक अभिनेत्री आपले सौंदर्य टिक विण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतात. विशेष म्हणजे चेहऱ्याच्या सौंदर्याला ते जास्त प्राधान्य देतात. मात्र चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते ते आपल्या ओठांमुळे. मात्र ऋतूमानाचा परिणाम आपल्या ओठांवर दिसून येतो. हिवाळ्यात तर ओठाच्या बऱ्याच समस्या निर्माण होतात.  हिवाळ्याला आरोग्यदायी ऋतू म्हटले जाते. मात्र या ऋतूमध्ये तुम्ही आरोग्याची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. हिवाळ्यात तापमान कमी झाल्याने थंडीच्या दिवसात आरोग्याकडे खासकरुन त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते. थंडीच्या दिवसात आपण पाणी कमी पितो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. परिणामी त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे ओठ आणि त्वचेची योग्य काळजी घेऊ शकता. ओठ फाटल्यानंतर ओठांवरील निघालेली त्वचा काढू नका. असे केल्यास ओठ आणखीन फाटण्याची शक्यता असते तसेच दुखापतही होऊ शकते.फाटलेल्या ओठांना सॉफ्ट आणि मऊ ठेवण्यासाठी मध एक चांगला उपाय आहे. फाटलेल्या ओठांवर दररोज २-३ वेळा मध लावा. थोडसा मध रात्री झोपण्यापूर्वी लावण्यानेही फायदा होतो. एक चमचा दूध आणि १ चमचा मध एकत्रित करुन हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर थंड झालेले मिश्रण ओठांवर हलक्या हाताने लावा. ओठांना लीप लोशन किंवा लीप बाम लावून घराबाहेब पडावे. दिवसातून २-३ वेळा ओठांवर आॅलिव्ह आॅइल किंवा खोबरेल तेल लावल्यास फुटलेल्या ओठांना काहीसा आराम मिळतो. हिवाळ्यात अतिशय थंड पाण्याने आंघोळ करू नका, त्यामुळे त्वचा जास्त कोरडी पडू शकते. कोणतेही सौदर्य प्रसाधन वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.