शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

​अति जास्त प्रमाणात चांगले कोलेस्टेरॉलसुद्धा धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 18:04 IST

हाय-डेन्सिटी लिपोप्रोटिन (एचडीएल) कोलेस्टेरॉल जर शरीरात जास्त प्रमाणात असेल तर अवेळी मृत्यू होण्याची शक्यता वाढते.

अति तेथे माती. मराठीमधील ही म्हण वैद्यकशास्त्रातही लागू पडते. कोणतीच गोष्ट, मग ती चांगली का असेना, अति जास्त प्रमाणात असणे तोट्याचे ठरू शकते. नव्या संशोधनाअंती असे दिसून आले की, हाय-डेन्सिटी लिपोप्रोटिन (एचडीएल) कोलेस्टेरॉल, जे स्ट्रोक व हृदयविकाराचा धोका कमी करते, ते जर शरीरात जास्त प्रमाणात असेल तर अवेळी मृत्यू होण्याची शक्यता वाढते.आरोग्यासाठी लाभदायक समजले जाणारे कोलेस्टेरॉलदेखील अधिक जास्त प्रमाणात असेल किंवा गरजेपेक्षा कमी असले तर व्यक्तीला मृत्यूचा धोका संभावतो. संशोधकांच्या मते, योग्य प्रमाणात एचडीएल कोलेस्टेरॉल असेल तर आयुर्मान वाढण्यात हातभार लागतो.वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल आॅफ मेडिसिनमधील सहायक प्राध्यापक झियाद अल-अली यांनी सांगितले की, आम्ही केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष खरोखरंच आश्चर्यकारक आहेत. पूर्वी मानले जात असे की, चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढली तर आरोग्यास लाभ होतो. त्यामुळे एचडीएल कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी आणि अवेळी मृत्यूचा संबंध असतो हे समोर येणं थोडसं शॉकिंग होतं.’या संशोधनामध्ये सुमारे एक लाख सत्तर हजार पुरुषांच्या किडनी फंक्शन आणि एचडीएल कोलेस्टेरॉल पातळीचा अभ्यास करण्यात आला. धमण्यांमधील हानीकारक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचे काम एचडीएल करत असते. त्याचे अति जास्त किंवा अति कमी प्रमाण असेणे आरोग्यासाठी घातक आहे.