शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

'या' सोप्या उपायांनी कधीही फाटणार नाहीत ओठ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 12:18 IST

वातावरण बदलामुळे ओठ फाटणे आणि रखरखीत होणे ही सामान्य बाब आहे. ओठांची त्वचा अधिक फाटल्याने त्यातून रक्त येणे, मास निघणे आणि कोल्ड सोर्स सारख्या समस्या होऊ शकतात.

वातावरण बदलामुळे ओठ फाटणे आणि रखरखीत होणे ही सामान्य बाब आहे. ओठांची त्वचा अधिक फाटल्याने त्यातून रक्त येणे, मास निघणे आणि कोल्ड सोर्स सारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे खासकरुन या दिवसात त्वचेसोबतच ओठांची खाळजी घेणे गरजेचे असते. चला जाणून घेऊ काही खास उपाय...

ओठ फाटण्याचं कारण

ओठांवर पुन्हा पुन्हा हात लावल्याने ते कोरडे होणे, सूज येणे आणि खाज येणे या समस्या होतात. तसेच ओठांवर पुन्हा पुन्हा जिभ फिरवल्यानेही ओठांना कोरडेपणा येतो. ओठांची त्वचा ही तीन थरांची असते आणि ती सतत जिभ लावल्याने कोरडी होते. आपल्या श्वास घेण्याच्या पद्धतीवरुही ओठ फाटण्याची समस्या होऊ शकते. तोंडाने श्वास घेतल्याने ओठ फाटण्याची आणि कोरडे होण्याची समस्या होऊ शकते. ओठांवर सतत येणाऱ्या हवेमुळे त्यांचा ओलावा नष्ट होतो आणि ओठ कोरडे होतात.

काय कराल उपाय?

ओठांवर वेगळं सलस्क्रीन लोशन लावा. याने केवळ त्वचेला कोमलता नाही तर सुरक्षाही मिळेल. सनस्क्रीन लावून उन्हात गेल्यावर ओठ फाटणार नाहीत. 

रायबोफ्लेविन, हिरव्या भाज्या खाल्ल्यानेही त्वचा आणि ओठ हेल्दी राहतात. जर तुमचेही ओठ जास्तच कोरडे होत असतील तर हिरव्या भाज्या अधिक खाव्यात. व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा संतुलित प्रमाणात आहारात समावेश केला तर फायदा होईल.  

जास्त प्रमाणात लिप लायनर, लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस लावल्यानेही ओठांचा ओलावा नष्ट होतो. त्यामुळे ओठांचं फाटणं थांबवायचं असेल तर ही उत्पादने वापरणे कमी करावे. जर उत्पादनांमध्ये अल्कोहोल असेल तर अशी उत्पादने दूरच ठेवा. 

तसेच जास्तीत जास्त पाणी प्यावे, याने शरीराची पाण्याची गरज भागेल. यासोबतच सतत सोबच पेट्रोलियम जेली किंवा मेडिकेटेड लिप बाम ठेवा. जेव्हाही तुम्हाला वाटेल की, ओठ कोरडे होत आहेत, तेव्हा हे लाव.  

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स