शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केसांना कलर केल्यानंतर 'या' टिप्स ट्राय करा; कलर जास्त वेळ टिकण्यास होईल मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 13:28 IST

प्रत्येकजण आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक  प्रयत्न करत असतो. त्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. पार्लरच्या महागड्या हेअर ट्रिटमेंट्सदेखील करण्यात येतात.

प्रत्येकजण आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक  प्रयत्न करत असतो. त्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. पार्लरच्या महागड्या हेअर ट्रिटमेंट्सदेखील करण्यात येतात. पार्ल्ररमध्ये महागड्या ट्रिंटमेट करण्याऐवजी तुम्ही अनेक घरगुती उपयांनी घरच्या घरी अनेक गोष्टी करू शकता. बरेचजण केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी त्यांना कलर करण्याचा मार्ग स्विकारतात. तुम्ही घरच्या घरी केसांना करा किंवा पार्लरमध्ये जाऊन कलर करा. मनामध्ये फक्त एकच इच्छा असते की, आपण केलेला कलर जास्तीत जास्त वेळ तसाच रहावा. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पांढरे केस. जर तुम्हाला तुमचा कलर जास्तीत जास्त वेळ तसच ठेवायचा असेल तर जाणून घेऊयात काही खास टिप्स. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या केसांचा कलर जास्तीत जास्त वेळ टिकवू शकता. 

1. हेअर कलर केसांवर तेव्हाच खूप वेळ टिकू शकेल जेव्हा कलर करण्याआधी केसांवर लक्ष देण्यात येईल. कलर करण्यापूर्वी एक महिनाआधी केसांच्या मजबूतीवर लक्ष देणं गरजेचं असतं. आठवड्यातून कमीतकमी तीन वेळा केसांना तेल लावा. केसांची निगा राखा. मोठ्या प्रमाणात केस गळत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यानंतर हेअर कलर करा. 

2. जेव्हा तुम्ही केसांना कलर करणार असाल त्यावेळी तुमच्या केसांनुसार योग्य त्या प्रोडक्टचा वापर करा. जर मागच्यावेळी हेअर कलर करताना केसांना त्रास झाला असेल तर यावेळी प्रोडक्ट बदलून वापरा. 

3. जर तुम्ही स्वतः घरच्या घरीच केस कलर करणार असाल तर केस कलर करण्यासाठी आणलेल्या प्रोडक्टवर लिहिलेल्या सर्व सुचना नीट वाचा आणि त्यानुसार कलर करा. 

4. हेअर कलर केल्यानंतर केसांना काही दिवसांपर्यंत केस धुण्यासाठी जास्त शॅम्पू वापरू नका. जर पहिल्या आठवड्यात 3 ते 4 वेळा शॅम्पू करत असाल तर आता कमी करून 2 ते 3 वेळा करा. 

5. हेअर करल केल्यानंतर डॅमेज झालेल्या केसांना ट्रिम करा. नाहीतर केसांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. 

6. हेअर कलर केल्यानंतर कोणत्या शॅम्पूचा वापर करायचा या गोष्टीवर लक्ष द्या. 

7. शॅम्पूसोबत चांगलं कंडिशनरचाही वापर करा. केसांसाठी शॅम्पू जेवढा गरजेचा आहे तितकाच कंडिशनरही महत्त्वाचं आहे. याचा चुकीचा वापर केल्याने केस डॅमेज होण्याची शक्यता असते. 

8. हेअर कलर केल्यानंतर केस अधिक ड्राय होऊ लागतात. त्यामुळे केस मॉयश्चरायझ करणं गरजेचं असतं. काही होम मेड हेअर पॅक केसांना लावा. मध, कोरफड, दही, कोकनट मिल्क यांसारख्या गोष्टी स्काल्प आणि केसांना लावल्याने केसांना पोषण मिळण्यास मदत होते. 

9. काही लोकांचा असा समज आहे की, हेअर कलर केल्यानंतर केसांना कमी तेल लावावं. परंतु असं केल्याने केस आणखी कमजोर होतात. परिणामी ते आणखी तुटतात. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स