पातळ केसांना असे करा जाड...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 17:53 IST
महिलांना केसांच्या बाबतीत असंख्य समस्या पाहावयास मिळतात आणि यामुळे त्या खूप नाराजही असतात
पातळ केसांना असे करा जाड...!
महिलांना केसांच्या बाबतीत असंख्य समस्या पाहावयास मिळतात आणि यामुळे त्या खूप नाराजही असतात. त्यात सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे केसांचे जाड असणे. यासाठी कित्येक महिला बाहेरील प्रॉडक्ट्सचा वापर करतात, मात्र याने खूपच कमी फायदा होतो. जर आपणही आपल्या केसांच्या बाबतीत अशा समस्येने ग्रासले असाल तर काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय करु शकतात. * गाजरात विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असल्याने रोज गाजराचा ज्यूस प्या. यामुळे आपले केस पातळ असतील तर जाड होण्यास मदत होईल.* शिवाय कांद्याचा रस डोक्याला लावल्यास आपले केस जाड होतील. कारण यात सल्फर असते, जो कालेजन टिशू उत्पन्न करतो. * बटाट्याचा कीस करुन त्यातून रस काढा आणि केसांना लावा. या रसात खूप मोठी शक्ती असते, ज्यामुळे पातळ केसांना जाड करतो.* संत्र्यांमध्ये ‘विटॅमिन सी’ चे प्रमाण भरपूर असल्याने आणि ते आपल्या केसांना लावल्यास आपले केस नक्कीच जाड होतील. यातील अॅण्टीआॅक्सिडेंट फ्री रॅडिकल्सशी लढा देतात आणि जे केसांच्या मुळाला कमजोर करतात.