शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

'ही' आहेत केसगळतीची मुख्य कारणं; जाणून घ्या त्यावरील उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 17:13 IST

आजच एका येऊ घातलेल्या हिंदी चित्रपटाचं नाव 'उजडा चमन' आहे असं वाचलं. उत्सुकता निर्माण झाली म्हणून आणखी शोधाशोध केली तर कळलं की, या चित्रपटातील हिरोची गोष्ट अकाली टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित आहे.

- डॉ नेहा पाटणकर 

आजच एका येऊ घातलेल्या हिंदी चित्रपटाचं नाव 'उजडा चमन' आहे असं वाचलं. उत्सुकता निर्माण झाली म्हणून आणखी शोधाशोध केली तर कळलं की, या चित्रपटातील हिरोची गोष्ट अकाली टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित आहे. म्हणजेच आजच्या युगातला हा किती जिव्हाळ्याचा विषय आहे हेच अधोरेखीत होतंय. पूर्वी केसांची जोपासना करणे, त्यांची  नीट काळजी घेणे हे स्त्रियांच्या अखत्यारीत येत होतं. लांब केस असणं एक सौंदर्याचं लक्षण मानले जात असे. त्यामुळे केस गळतात का? असं विचारलं की, अत्यंत काळजीयुक्त स्वरात 90 टक्के स्त्रिया "हो" असंच उत्तर देताना दिसतात. 

खरं तर आपल्या स्काल्प वर असलेल्या 1 लाख हेअर फॉलिकल्स पैकी 50 ते 100 केसांची दररोज गळती होणे हे अगदी नॉर्मलच असते. असे अमेरिकन असोसिएशन ऑफ डर्मटोलॉजिस्ट  यांचं म्हणणं आहे. डोक्याचे केस गळणं किंवा अकाली टक्कल पडणं हे बरचसं अनुवांशिक असतं. पण हल्ली अगदी तिशी, चाळिशीतच टक्कल पडणे, खूप केस गळणे, पातळ होणे हे अकाली वार्धक्याचंही लक्षण असू शकतं. हल्ली तिशी किंवा चाळीशीत antidepressants, हाय बीपी साठी औषधं, हाय यूरिक अॅसिड औषधं हे घेण्याचं प्रमाणही वाढलं आहे. या औषधांचा साईड इफेक्ट म्हणूनसुद्धा केस गळू शकतात. मुख्यत्वे स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, पिंपल्ससाठी घेण्यात येणाऱ्या औषधांमधील हाय व्हिटॅमिन ए हेसुद्धा केस गळतीचे कारण असू शकतं.

अचानक सुरू झालेली केस गळती  ही खूप मोठ्या आजारपणानंतर चालू होऊ शकते. आजकाल पटकन वजन कमी करण्यासाठीचे डाएटस करण्याच्या प्रथेनुसार म्हणजेच, अमक्या तमक्या समारंभासाठी बारीक दिसायचं आहे. हे तर खूपच सामान्य झालं आहे. कुठलाही क्रॉनिक स्ट्रेस किंवा मानसिक धक्का हे अचानक केस गळतीचं कारण ठरतं. हिमोग्लोबिनची कमतरता, आहारातील प्रोटीनचे कमी प्रमाण, थायरॉइड हार्मोन्सची कमी किंवा जास्त प्रमाण असेल तर, त्यामुळे नक्की केस गळतात, विरळ होतात. 

आजच्या युगातल्या PCOD चं मुख्य लक्षण केस गळणे, अकाली टक्कल पडणे हेच असतं. डोक्याच्या त्वचेला झालेल्या काही फंगल इन्फेक्शनमुळे केसांची गळती वाढते. केमिकलयुक्त शॅम्पू औषधांच्या दुकानात सर्रास उपलब्ध असतात. परंतु खूप जास्त त्रास असेल तर मात्र skin specialist चा सल्ला नक्की घ्यायला हवा. कॅल्शिअम, मॅग्नेशियम, बायोटिन, झिंक, व्हिटॅमिन बी 12 ही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स केसांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. आयर्नच्या कमतरतेमुळे कमी होणारे हिमोग्लोबिन  केसांचे पुरेसे पोषण करत नाही. भारतामध्ये हे एक केस गळण्याचं मुख्य कारण आहे. 

आहारामध्ये हिरव्या भाज्या, पालेभाज्या आणि प्रोटिन्स असलेला संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. 

केस किती गळणार, टक्कल किती पडणार हे जरी काही अंशी अनुवंशिकता ठरवत असेल तरी आपणही काही गोष्टी केल्यामुळे आणि काही गोष्टी न केल्यामुळे ही समस्या आपल्यावर ओढवून घेत असतो. म्हणूनच पोषक आहाराने शरीराची काळजी घेणे आणि मेडीटेशन/योगा करून मनाची काळजी घेणे हे केसांचं आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. 

केसांची निगा राखण्यासाठी पाळण्याची पथ्य -

1) केस खूप जोरात विंचरल्याने केसांच्या मुळांना दुखापत होऊ शकते.2) केसांना खूप शॅम्पू लावणे टाळावे. 3) केस ओले असताना खसखसून पुसू नयेत.4) हेअर स्प्रे, हेअर ड्रायर यांचा कमीत कमी वापर करणे.5) केसांना वेगवेगळे रंग चढवणे हानिकारकच.6) केस खूप घट्ट बांधून ठेवण्याने केसांवर ताण येतो

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स