शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

आकर्षक आयब्रोज हवे असतील 'या' घरगुती टीप्स नक्की वापरा, मग बघा कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 12:58 IST

प्रत्येकालाच आपल्या आयब्रोजचे केस वाढवायचे असतात.

(image credit- the lassi.com)

प्रत्येकालाच आपल्या आयब्रोजचे केस वाढवायचे असतात. कारण तुमच्या भुवया तुमच्या व्यक्तीमत्वात भर टाकत असतात. तसंच आकर्षक दिसण्यासाठी भुवया दाट आणि काळ्याभोर असणं गरजेचं असतं. डोळ्यांच्या सुंदर दिसण्यामागे भूवया सुध्दा तितक्याच महत्वाच्या असतात. आयब्रोजना व्यवस्थित शेप देणं खूप कठिण असतं. अनेकदा वेगवेगळे प्रयत्न करून सुद्धा आयब्रोजचे केस वाढतं नाहीत. त्यामुळे चेहरा नीट दिसत नाही. म्हणून आयब्रोपेन्सिलचा वापर अनेक महिला करतात. आज आम्ही तुम्हाला आयब्रोज सुंदर दिसण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही स्वतःचे आयब्रोज दाट मिळवू शकता. 

नारळाचं तेल 

केसांची काळजी घेण्यासाठी तसंच केसांच्या वाढीसाठी नारळाचं तेल खूप फायदेशीर ठरतं असतं. तसंच आयब्रोच्या केसांसाठी सुद्धा नारळाचं तेल लावणं फायदेशीर ठरतं असतं. कारण पोषण देण्याचे काम तेलाद्वारे होत असतं. त्यासाठी नारळाच्या तेलाला कोमट गरम करून त्या तेलाने  भुवयांच्या भागावर हलक्या हाताने मसाज केल्यास भुवयांची त्वचा चांगली राहते . तसंच केसांची सुद्धा वाढ होते. 

बादामाचं तेल 

केस गळण्यापासून रोखण्यासाठी बादामाच्या तेलाचा वापर केला जातो. केसांना मजबूती देण्यासाठी व्हीटामीन ई ची आवश्यकता असते.  बदामाच्या तेलात व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणावर असतं. यात असणारे  एंटी ऑक्सीडेंट्स  स्किन आणि केसांसाठी चांगले असतात. त्यामुळे या तेलाने भुवयांची मसाज केल्यास भुवयांचे केस दाट आणि काळे होतात. 

राईचं तेल  

राईच्या तेलाने मसाज करण्याचे अनेक फायदे आहेत.  राईच्या तेलाने भुवयांच्या केसांची मसाज केल्यास त्वचेला पोषण मिळते. तसंच त्या भागातील केस जलदगतीने वाढतात. 

पेन्सिलचा योग्य वापर 

जर तुम्ही स्वतःच भुवयांना योग्य आकार देण्याचा विचार करत असाल तर, आयब्रो पेन्सिलचा रंग निवडताना काळजी घ्या. हा रंग तुमच्या भुवयांच्या रंगाशी मिळता जुळता असला पाहिजे. जर तुम्ही रंग निवडताना कनफ्यूज असाल तर नेहमी डार्क रंगाचीच निवड करा. जर तुमच्या भुवयांच्या केसांचा रंग ब्राऊन असेल तर त्यासाठी डार्क ब्राऊन रंगाच्या आयब्रो पेन्सिलची निवड करा. त्यामुळे भुवयांचा रंग नॅचरल दिसण्यास मदत होईल.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स