शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

​...म्हणून केस होतात पातळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

केस पातळ होण्याचे कारणे वेगळे असतात आणि आपण उपाय वेगळाच करतो. म्हणून यावर उपचार करण्यापूर्वी यामागील कारण जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. बघू कोणते असे कारण आहे ज्याचा प्रभाव आपल्या केसांवर पडतोय.

-रवींद्र मोरे दाट आणि काळेभोर केस असले की आपल्या सौंदर्यात अजून भर पडते. मात्र हल्ली महिलांचे केस पातळ होण्याची समस्या वाढतच चालली आहे. याचाच परिणाम आपल्या सौंदर्यावर पडत असतो. केस दाट करण्यासाठी मग महिला महागडे प्रॉडक्ट्स खरेदी करतात, मात्र अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. कारण केस पातळ होण्याचे कारणे वेगळे असतात आणि आपण उपाय वेगळाच करतो. म्हणून यावर उपचार करण्यापूर्वी यामागील कारण जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. बघू कोणते असे कारण आहे ज्याचा प्रभाव आपल्या केसांवर पडतोय.* केसांना अतिप्रमाणात तेल लावणेकेसांना अतिप्रमाणात तेल लावण्याने स्कॅल्पचे पोर्स बंद होऊन जातात आणि त्यांची वाढ थांबते. बंद पोर्समध्ये साठणारे तेल आणि घाणीमुळे केस कमजोर होऊन जातात. * केस रगडून धुणेशॅम्पू करताना आपण केसांना जोराने रगडत असाल तर आपले केस पातळ होऊ शकतात. शिवाय याने केस कमजोर होऊन तुटू लागतात. त्यासाठी शॅम्पू करताना हलक्या हाताने मसाज करा.* ओले केस विंचरणेबºयाचजणांना ओले केस विंचरण्याची सवय असते. ओले केस विंचरण्याने केस तुटतात. ओल्या केसांना बोटांनी मोकळे करा नंतर नरम टॉवेलने पुसा. केस वाळल्यावर कंगव्याने केस विंचरा.* केसांमध्ये हीटचा प्रयोगजर आपण केसांवर हीटिंग टूल जसे स्ट्रेटनर, कलर्स आणि नियमित ड्रायर वापरत असाल तर आपले केस पातळ होऊ लागतात. हीटचा प्रयोग कमी करून बघा आपल्या केसांचं आरोग्य सुधारेल.* तणावग्रस्त राहणे तणावाचा परिणामही केसांवर होतो. जास्त तणावात राहिल्याने केस पातळ होऊ लागतात. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा मग बघा याचा परिणाम आपल्या केसांवरही दिसून येईल.* क्रॅश डाइटकेस मजबूत होण्यासाठी हेल्थी आणि बॅलेस डाइट गरजेची आहे. आपल्या आहारात भरपूर आयरन आणि प्रोटिनचा समावेश करा. दुबळं दिसण्याच्या क्रेझमुळे क्रॅश डाइट करणे योग्य नाही.