शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

Smart Tips : ​पुरुषांनो, काळानुसार स्मार्ट दिसायचे आहे ना? मग असा करा स्वत:मध्ये बदल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 14:57 IST

पुरुषांनीही स्वत:ची काळजी घेऊन स्मार्ट दिसण्याची गरज आहे. अशा काही टिप्स आहेत त्याद्वारे आपण नक्कीच सर्वात उठून दिसाल.

-रवींद्र मोरे आपणही एखाद्या सेलिब्रिटीसारखे स्मार्ट दिसावे असे प्रत्येक पुरुषाला वाटते. मात्र सुंदर दिसणे ही फक्त स्त्रियांचीच गरज आहे, अशी आपली धारणा झालेली आहे. त्यामुळे बहुतांश पुरुष स्त्रियांच्या तुलनेने स्वत:साठी खूपच कमी वेळ देतात. मात्र आता काळ बदलत चालला आहे. पुरुषांनीही स्वत:ची काळजी घेऊन स्मार्ट दिसण्याची गरज आहे. आज आम्ही आपणास अशाच काही टिप्स देत असून त्याद्वारे आपण नक्कीच सर्वात उठून दिसाल.* निस्तेज त्वचेसाठी- स्त्रियांप्रमाणेच काही पुरुषांनादेखील पिंपल्स, डाग, त्वचेची शुष्कता अशा समस्या असू शकतात. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा निस्तेज दिसू लागते. या समस्यांचे प्रमाण कमी असल्यास त्या मेकअपने लपवण्याचा प्रयत्न करा. जर चेहरा खूपच खराब दिसत असेल तर काही ब्युटी ट्रीटमेंट्सची मदत घ्या.* हात-पायांची काळजी -बरेच पुरुष स्वत:च्या हात-पायाची काळजी घेत नाही. जसे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ दिसावी म्हणून आपण प्रयत्न करतो तशी च हात-पायाचीही त्वचाही स्वच्छ दिसावी म्हणून वेळोवेळी पाण्याने धुवावी. शिवाय वाढलेली नखे वेळेवर काढावीत. नखांच्या भोवतालच्या त्वचेचीही स्वच्छता ठेवावी. एखादया कार्यक्रमात जायायचे असेल तर काही दिवस आधी सलूनमध्ये जाऊन किंवा घरीच मेनिक्युर आणि पेडिक्युर अवश्य करा.* पोटावरील अतिरिक्त चरबी- अनेक पुरुषांमध्ये आढळणारी एक समस्या म्हणजे त्यांचे वाढलेले पोट. यामुळे आपल्या सौंदर्यावर नक्कीच गदा येत असते. या समस्येवर नियंत्रण मिळवणे तसे कठीणच आहे. त्यामुळे या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खाण्यावर ताबा ठेवणे आवश्यक आहे. तसेच नियमित व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.* डार्क सर्कल्स- खूप वेळ कॉम्युटरसमोर बसून काम करणे, अपुरी झोप, ताण-तणाव, अशा विविध कारणांमुळे डार्क  सर्कल्सची समस्या वाढू शकते. यामुळे डार्क सर्कलसोबतच डोळे सुजण्याचीही शक्यता अधिक वाढते. यासाठी काकडी, टोमॅटो अशा काही घरगुती उपायांचा उपयोग करता येईल.* दातांची काळजी-समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पाडण्यासाठी दातांचे सौंदर्य जपणेदेखील आवश्यक आहे. पांढरेशुभ्र दात तुमची स्माईल सुधारण्यासही मदत करतात.Also Read : Beauty Tips : पुरुषांनो, स्मार्ट दिसायचयं? तर वापरा या घरगुती खास टिप्स !                   : ​SMART LOOK : डोक्यावर कमी केस आहेत? तरीही दिसा स्मार्ट !