गायक आनंद शिंदे रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 13:35 IST
मराठीतील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना शनिवारी अचानक छातीत दुखू लागल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गायक आनंद शिंदे रुग्णालयात दाखल
मराठीतील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना शनिवारी अचानक छातीत दुखू लागल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. कल्याणच्या फोर्टीस रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिंदे यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे समजते.त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. तेथे त्यांच्यावर बायपास सर्जरी होण्याची शक्यता आहे.