शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

​सकारात्मक विचारांची जादू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2016 14:19 IST

सकारात्मक विचारांशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. आपल्या जीवनात आलेले नैराश्य, अंधार आपण सकारात्मक विचारांच्या शक्तीने..............

सकारात्मक विचारांशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. आपल्या जीवनात आलेले नैराश्य, अंधार आपण सकारात्मक विचारांच्या शक्तीने पून्हा नव्या उमेदीने जीवन जगून आपल्या आयुष्यात आलेला अंधार दूर करु शकतो. आपल्या विचारांवर आपलेच नियंत्रण असल्याने आपल्यालाच ठरवायचे आहे की, सकारात्मक विचार करायचा आहे की नकारात्मक. मात्र तरीही नकारात्मकच विचारच आपण जास्त करतो. आजच्या सदरात आपण नेहमी कसे सकारात्मक विचार करावा याबाबत सीएनएक्सने घेतलेला आढावा. विचार दोन प्रकारचे आपल्या मनातील प्रत्येक विचार हा दोन प्रकारचा असतो. सकारात्मक आणि नकारात्मक. या विचारांवर आपला दृष्टिकोन किंवा व्यवहार अवलंबून असतो. विशेष म्हणजे आपण जसा विचार करतो, तसे बनतो. म्हणूनच म्हटले जाते की, आपला जसा विचार असतो तसेच आपले आचरणदेखील असते. मग आचरण कसे ठेवायचे हे मुळात आपल्यावर अवलंबून असते. आपण कोणत्या रंगाचा चष्मा लावला आहे आपण जर काळ्या रंगाचा चष्मा लावला असेल तर सर्वत्र काळे दिसेल आणि लाल रंगाचा असेल तर लाल दिसेल. याचप्रकारे नकारात्मक विचारांमुळे आपल्याला सर्वत्र नैराश्य, दु:ख आणि असंतोष दिसते आणि सकारात्मक विचारांनी आपल्याला कायम आशा, सुख आणि समाधानच दिसते. आता आपण हे ठरवायचे आहे की, सकारात्मक चष्मा लावून जगाकडे पाहायचे की, नकारात्मक चष्म्याने पाहायचे. जर आपण सकारात्मकतेचा चष्मा लावला असेल तर आपल्याला प्रत्येक व्यक्ति चांगला वाटेल आणि जर नकारात्मक चष्मा लावला असेल तर आपल्याला सर्वत्र वाईटच दिसेल, आणि कालांतराने आपण तसेच बनू. कसे बनाल सकारात्मक ?सकारात्मकतेची सुरूवात आशा आणि विश्वासाने होत असते. कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास हा गमवायचा नाही आणि नेहमी आशावादी राहायचे. एका ठिकाणी चारही बाजूंनी अंधार असेल आणि काहीच दिसत नसेल तर त्याठिकाणी आपण एक लहानसा दिवा लावला तर त्या दिव्यामुळे एका क्षणात सर्वत्र पसरलेला अंधार दूर होईल. याचप्रकारे आशाचे किरण म्हणजेच सकारात्मक विचार सर्व नकारात्मक विचारांना एका क्षणात मिटवून टाकतात.  नकारात्मकतेला नकारात्मक नष्ट करु शकत नाही, नकारात्मकतेला केवळ  सकारात्मकताच नष्ट करू शकते. यासाठी जेव्हाही नकारात्मक विचार मनात येईल, त्याचवेळी सकारात्मक विचारात त्याचे परिवर्तन व्हायला हवे. सकारात्मक बनण्यासाठी काही टिप्स * जीवनात नेहमी चांगलेच शोधा, न्युनगंड बाळगू नका. संकटांच्या बाबतीत विचार न करता आपल्यातील बलस्थानांच्या बाबतीत विचार करा, ज्यांच्या आधारे आपण त्या समस्या सोडवू शकू. * दुसºयांजवळ काय आहे, याबाबत काळजी न करता आपल्याजवळ जे काही त्यात समाधानी रहा. हा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या जीवनातील नकारात्मता संपुष्टात आणेल. * जे काम हाती घेतले आहे, ते पूर्ण करा. प्रत्येक काम अपूर्ण सोडले तर आपल्या जीवनात नकारात्मक विचार प्रवेश करतात. * नेहमी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. जे पण काम आपल्या व्यवसायाशी संबंधीत आहे आणि आपल्याला ते काम येत नसेल तर ते नक्की शिका. असे केल्याने आपण आपल्या कामात परिपूर्ण बनाल आणि आपल्या जीवनात सकारात्मक उर्जा संचारेल. * वेळोवेळी निस्वार्थ भावनेने परक्या व्यक्तिंची मदत करुन पहा. असे केल्याने आपला सामाजिक दृष्टिकोन वाढेल आणि आपल्याबरोबरच समाजात सकारात्मक उर्जेचा प्रवाह संचारेल.  * जे लोक नेहमी नकारात्मक विचार करतात किंवा नेहमी भांडणे, शंका करतात त्यांच्यापासून चार हात लांबच रहा. * सकारात्मकता विचारसरणी बळावण्यासाठी नेहमी ध्यानधारणा करा आणि सकारात्मक विचार करणाºया व्यक्तिंच्या संपर्कात रहा. * प्रत्येक दिवशी एक नवे ध्येय निश्चित करुन कामास सुरूवात करा आणि त्या ध्येयाला नक्की पूर्ण करा. असे केल्याने आपले जीवन सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यास सुरुवात करेल.  ravindra.more@lokmat.com