गुलाबी ओठांसाठी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 17:23 IST
आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसावे असे प्रत्येकालाच वाटते.
गुलाबी ओठांसाठी...
आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसावे असे प्रत्येकालाच वाटते. मुलगी असो वा मुलगा सर्वचजण याबाबत चिंताग्रस्त असतात. यात काहीजण ओठांच्या काळेपणानेदेखील त्रस्त असतात. त्याला दूर करण्यासाठी कित्येक प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरतात. आपणही याच समस्येने त्रस्त असाल तर खालील घरगुती उपायाने आपण आपले ओठ हेल्दी आणि गुलाबी बनवू शकाल. लिंबूमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. लिंबूचा वापर आपण आपले ओठ गुलाबी करण्यासाठीदेखील करु शकता. यासाठी लिंबाच्या रसाला प्रभावित जागेवर लावा आणि १५ मिनिटानंतर धुवून टाका, असे रोज केल्याने आपले ओठ गुलाबी होण्यास मदत होते. सदृढ आरोग्यासोबतच आपल्या त्वचेला गोरे बनविण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे पिग्मेंटेशनला दूर करण्यास मदत करतात. याला आपण दहीसोबत मिक्स करून वापरु शकता. दह्यात लॅक्टिक अॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. दह्याला आंघोळीच्या अगोदर संपूर्ण चेहऱ्याला लावा. असे रोज केल्याने चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबरच ओठांना गुलाबीपणा येण्यास मदत होते.