या कारणाने होतात पिंंपल्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 16:03 IST
चेहऱ्यावर अनावश्यक पिंपल्स येऊन आपल्या सौंदर्यात बाधा येते. मात्र या धावपळीतून थोडा वेळ काढून थोडी काळजी घेतली तर या दुष्परिणाचा धोका टाळता येऊ शकतो.
या कारणाने होतात पिंंपल्स !
दिवसेंदिवस प्रदुषण आणि आयुष्याची धावपळ वाढत आहे, यामुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावाचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिसत असतो. साहजिकच यामुळे आपला चेहराही निस्तेज होतो. चेहऱ्यावर अनावश्यक पिंपल्स येऊन आपल्या सौंदर्यात बाधा येते. मात्र या धावपळीतून थोडा वेळ काढून थोडी काळजी घेतली तर या दुष्परिणाचा धोका टाळता येऊ शकतो.काय उपाय कराल? * दिवसभरात हात अनेक वेळा बॅक्टेरियाच्या संपर्कामध्ये येतात. जेव्हा आपण चेहºयाला हाताने स्पर्श करतो तेव्हा बॅक्टेरीया आणि अस्वच्छता स्किनला खराब करतात. त्यामुळे चेहऱ्याला जास्त हात लावु नका. वेळो-वेळी हात धुवत राहा. * आपण फेशियल, स्क्रब आणि टॉवेलने स्किन घासतो. आपल्याला वाटते की, स्किन स्वच्छ झाली परंतु असे होत नाही, यामुळे त्वचेला नुकसान पोहोचते. आठवडयातुन एक वेळा डेड सेल्स काढल्याने चेहरा स्वच्छ होतो.* एका रात्रीतुनच चमत्काराच्या अपेक्षेने अनेक लोक रात्रो-रात्री स्किनचे उत्पादन बदलत राहतात. प्रत्येक उत्पादनात नविन कॉम्बिनेशन आणि नविन केमिकल्स असते. स्किन उत्पादन पुन्हा-पून्हा बदल्याने अपेक्षीत फायदा मिळत नाही परंतु चेहरा नक्की खराब होतो.Also Read : पिंपल्स झालेत?