हृदयाच्या पॉवरवर चालणार पेसमेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:12 IST
बिघडलेल्या हृदयाला चालना देण्यासाठी पेसमेकरचा वापर केला जातो. पेसमेकरमुळे लाखो जणांचे प्राण वाचतात....
हृदयाच्या पॉवरवर चालणार पेसमेकर
बिघडलेल्या हृदयाला चालना देण्यासाठी पेसमेकरचा वापर केला जातो. पेसमेकरमुळे लाखो जणांचे प्राण वाचतात. मात्र दर ५ ते १२ वर्षांनी पेसमेकरची बॅटरी बदलावी लागते.लवकरच आता यापासून सुटका मिळणार आहे. वैज्ञानिक विना-बॅटरी पेसमेकर बनवत आहेत जे हृदयाच्या पॉवरवर कार्य करतील.हृदयाच्या स्पंदनांमुळे तयार होणार्या ऊज्रेला विजेमध्ये रुपांतर करण्याचे 'पाईझोईलेक्ट्रिक सिस्टिम' तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.याद्वारे पेसमेकरला ऊर्जापुरवाठा केला जाणार आहे आणि त्यामुळे बॅटरी वापरण्याची गरज पडणार नाही.