शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

​झोपेत होणाऱ्या श्वसनाच्या त्रासापासून मुक्ती देणारे नवे यंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 22:48 IST

‘सेंट्रल स्लीप अ‍ॅप्निया’वर (सीएसए) प्रभावी इलाज करणारे इम्लांट डिव्हाईस विकसित करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.

‘सेंट्रल स्लीप अ‍ॅप्निया’वर (सीएसए) प्रभावी इलाज करणारे इम्लांट डिव्हाईस विकसित करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. ‘सीएसए’ असलेल्या लोकांच्या मेंदूचे झोपेत श्वसनक्रियेवर नियंत्रण नसते. त्यामुळे झोपे दरम्यान श्वसनात अनेक समस्या निर्माण होतात. यावर कार्यक्षम उपचार निर्माण करण्यात आल्याचा दावा एका अध्ययनाद्वारे करण्यात आला आहे. ओहायओ स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनर मेडिकल सेंटरमधील संशोधक विल्यम अब्राहम यांनी सांगितले की, ‘हृदय बंद पडलेल्या एक तृत्यांश रुग्णांना ‘सीएसए’चा त्रास असतो. ही खूप चिंतेची बाब आहे. यामुळे हृदयाची स्थिती आणखी खालावण्याचीदेखील शक्यता असते. सध्या यावर शंभर टक्के इलाज करणाऱ्या उपचार पद्धती उपलब्ध नाहीत.’‘पॉझिटिव्ह एअरवेव्ह प्रेशर’ डिव्हाईसचा यावर उपचार म्हणून वापर करण्यात येतो; मात्र अनेक अध्ययनांतून त्यांची अपयुक्तता सिद्ध झाली आहे. प्रस्तूत संशोधकांच्या गटाने या नव्या ‘ट्रान्सव्हेनस फ्रेनिक नर्व्ह स्टिम्युलेटर’ डिव्हाईसची अमेरिका, जर्मनी आणि पोलंड येथील ३१ हॉस्पिटल्समध्ये चाचणी केली आहे.पेसमेकर प्रमाणेच हे डिव्हाईस झोपेमध्ये मेंदूला संदेश पाठवते. एकूण १५१ रुग्णांमध्ये हे डिव्हाईस इम्लांट करण्यात आले. पहिल्या सहा महिन्यांत यांपैकी ६८ डिव्हाईसेस उपचारासाठी सक्रीय करण्यात आली तर उर्वरित ७३ डिव्हाईसेस ‘नियंत्रित गट’ म्हणून इनअ‍ॅक्टिव्ह ठेवण्यात आली. सहा महिन्यांनंतर करण्यात तपासणी केली असता या डिव्हाईसमुळे ‘सीएसए’ इव्हेंटस्मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट दिसून आली.