मोतीबिंदू घालवण्यासाठी नवे औषध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:47 IST
भारतीय वंशाच्या संशोधकासह काही संशोधकांनी मोतीबिंदू नष्ट करण्यासाठी डोळ्यात टाकण्याचे ...
मोतीबिंदू घालवण्यासाठी नवे औषध
भारतीय वंशाच्या संशोधकासह काही संशोधकांनी मोतीबिंदू नष्ट करण्यासाठी डोळ्यात टाकण्याचे औषध शोधून काढले आहे. मोतीबिंदूमुळे दृष्टी जात असते. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करता येत असली तरी ती तुलनेने खर्चिक असते व अनेक लोक विकसनशील देशात उपचाराअभावी आंधळे होतात, असे संशोधकांचे मत आहे. मोतीबिंदू हा जास्त वयात होणारा नेत्ररोग असून काही प्रथिनांचे कार्य बिघडल्याने तो होतो. पार्किसन्सन म्हणजे कंपवात व अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंशासारखाच तो विशिष्ट वयानंतर होतो.