शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2018 : ग्लोइंग स्किनसाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये 'या' 5 पदार्थांचं करा सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 11:48 IST

शारदीय नवरात्रौत्सवास सुरूवात झाली असून आज घटस्थापनेचा दिवस. आज पहाटेपासूनच राज्यभरात देवींच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात झाली आहे.

शारदीय नवरात्रौत्सवास सुरूवात झाली असून आज घटस्थापनेचा दिवस. आज पहाटेपासूनच राज्यभरात देवींच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात झाली आहे. नऊ दिवसांचा उपवास पार पाडण्यासाठी सर्वजण अनेक गोष्टींची काळजी घेताना दिसत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा 5 पदार्थांबाबत सांगणार आहोत, जे पदार्थ तुम्ही उपवासाला खाऊ शकता. त्याचबरोबर हे स्किनसाठीही फायदेशीर ठरतील. यांच्या सेवनाने स्किन उजळण्यास आणि मुलायम होण्यास मदत होईल. 

1. शिंगाडा

नवरात्रीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये शिंगाडा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. हा उपवासात खाण्यात येणाऱ्या पदार्थांमधील सर्वात कॉमन पदार्थ आहे. शिंगाड्यामध्ये अॅन्टी-बॅक्टेरिअल आणि अॅन्टी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे त्वचेवरील मृत पेशींना आतून ठिक करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे त्वचा आपोआप उजळण्यास मदत होईल. 

2. ड्राय फ्रुट

काजू, बदाम, अक्रोड यांसारखे स्रव ड्रायफ्रुट्स स्किनसाठी फायदेशीर ठरतात. काजूमध्ये डॅमेज झालेले स्किन सेल्स रिपेअर करण्यासाठी आवश्यक असे गुणधर्म असतात. अक्रोड खाल्याने स्किन टाइट होते आणि स्किनवर सुरकूत्या दिसत नाहीत. त्याचप्रमाणे वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी आणि त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी बदामाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. दिवसातून 3 ते 4 बदाम खाणं स्किनसाठी फायदेशीर ठरतं. 

3. भोपळ्याच्या बिया

नवरात्रीच्या उपवासादरम्यान भोपळ्याच्या बियाही खाण्यात येतात. या बिया थोड्याशा भाजून खाता येतात. भोपळ्याच्या बिया खाल्याने स्किन उजळण्यास आणि नॅचरल ग्लो येण्यास मदत होते. 

4. दही

जर तुम्हाला ग्लोइंग स्किन हवी असेल तर तुमची स्किन आतून डीटॉक्सीफाय करणं गरजेचं आहे. दह्यामध्ये व्हिटॅमिन-बी2, बी6 आणि बी12 मुबलक प्रमाणात असतं. जे स्किन डीटॉक्सीफाय करण्यासोबतच मुलायम आणि ग्लोइंग बनवतं. 

5. साबुदाणा

नवरात्रीमध्ये साबुदाण्याचं सेवन फार केलं जातं. हेही तुमच्या स्किनसाठी फायदेशीर असतं. फक्त साबुदाण्यापासून कोणताही पदार्थ तयार करताना कमी तेलाचा वापर करावा. 

टॅग्स :Navratriनवरात्रीBeauty Tipsब्यूटी टिप्स