शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आयब्रो केल्यानंतर जळजळ होते का? 'या' टिप्स करतील मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 14:26 IST

डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक महिला आयब्रो करतात. अनेकदा थ्रेडिंग केल्यानंतर त्या  ठिकाणच्या त्वचेवर जळजळ येणं, सूज येणं किंवा त्वचा लालसर होणं यांसारख्या त्वचेच्या समस्या उद्भवतात.

डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक महिला आयब्रो करतात. अनेकदा थ्रेडिंग केल्यानंतर त्या  ठिकाणच्या त्वचेवर जळजळ येणं, सूज येणं किंवा त्वचा लालसर होणं यांसारख्या त्वचेच्या समस्या उद्भवतात. तसेच अनेक महिलांना थ्रेडिंग केल्यानंतर फक्त त्वचेला जळजळ होते. थ्रेडिंग करणं फार सोपा आणि सहज होणारा उपाय आहे. कारण त्यामध्ये कोणत्याही केमिकल्सची गरज लागत नाही. केमिकल असणाऱ्या प्रोडक्ट्सचा त्वचेवर वापर करणं अनेकदा नुकसानदायक ठरतं त्या तुलनेत थ्रेडिंग करणं फायदेशीर ठरतं. जर तुम्हाला थ्रेडिंग केल्यानंतर जळजळ होत असेल तर त्यापासून सुटका करून घेण्यासाठी क्रिमचा वापर करू नका. अनेकदा डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्याशिवाय क्रिमचा वापर केल्यास त्वचेला साइड इफेक्ट्स होतात. त्यापेक्षा घरगुती उपायांनी तुम्ही या त्रासापासून सुटका करून घेऊ शकता. 

थ्रेडिंग केल्यानंतर टोनरचा वापर करा

टोनरमध्ये कूलिंग इफेक्ट असतात. जे थ्रेडिंग केल्यानंतर होणाऱ्या जळजळीपासून सुटका करण्यास फायदेशीर ठरतं. त्यामुळे सूजही कमी होते. एका कापसाच्या बोळ्यावर थोडं टोनर घेवून ते जळजळ होत असलेल्या त्वचेवर लावा. थ्रेडिंगमुळे त्वचेचे पोर्स ओपन होतात. टोनर त्वचेचं पोर्स बंद करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

बर्फामुळे जळजळीपासून सुटका 

लाल झालेल्या त्वचेसोबतच सूज आणि जळजळीवर बर्फ परिणामकारक ठरतो. थ्रेडिंग केल्यानंतर जेव्हाही त्या भागावर लाल चट्टा तयार झाल्यास किंवा जळजळ होत असल्यास आइस क्यूबने मसाज करा. 

दूध

दूधामध्ये असलेले प्रोटीन थ्रेडिंग केल्यानंतर होणारी जळजळ, त्वचेवरील लाल चट्टे आणि सूज दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. दूध कापसाच्या मदतीने प्रभावित झालेल्या त्वचेवर लावा. 

काकडी

काकडीमध्ये एनजेसिक इफेक्ट्स असतात. जे थ्रेडिंगनंतर होणारी जळजळ दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. याव्यतिरिक्त यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. जे आयब्रोच्या आसपासच्या त्वचेवर होणारी जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. काकडीचा तुकडा 10 मिनिटांसाठी आयब्रोवर ठेवल्याने जळजळ दूर होण्यास मदत होते. 

कोरफडीचं जेल 

त्वचेवर होणारी जळजळ आणि लाल चट्टे दूर करण्यासाठी कोरफडीचा गर फायदेशीर ठरतो. कोरफडीचं जेल आयब्रोच्या आजूबाजूच्या त्वचेवर लावा. कोरफडीमध्ये कूलिंग इफेक्ट असतात. जे जळजळ दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स