शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेलपेन्ट काढण्यासाठी नेलपेन्ट रिमुव्हर संपलंय? 'हे' उपाय करतील मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 12:15 IST

आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. त्यासाठी अनेकदा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. तर सध्या अनेक महिला नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी वेगवेगळ्या नेलपेन्टस् वापरतात.

आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. त्यासाठी अनेकदा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. तर सध्या अनेक महिला नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी वेगवेगळ्या नेलपेन्टस् वापरतात. एकदा लावलेली नेलपेन्ट काढण्यासाठी नेल रिमुव्हरचा वापर करण्यात येतो. पण कधी नेल रिमुव्हर  संपलं असेल तर मॅचिंग नेलपेन्ट लावणं कठीण होऊन जातं अशावेळी गोंधळून जाण्याची गरज नाही. घरच्या घरी करता येणाऱ्या काही सोप्या उपायांनी तुम्ही सहज नेलपेन्ट रिमुव्ह करू शकता. जाणून घेऊयात अशा उपायांबाबत ज्यामुळे तुम्ही सहज नेलपेंट रिमुव्हरशिवाय नखांवरील नेलपेन्ट काढू शकता...

गरम पाणी

नखांवरील नेलपेन्ट काढण्यासाठी गरम पाणी फायदेशीर ठरतं. त्यासाठी एका बाउलमध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये साधारण 10 मिनिटांपर्यंत नख बुडवून ठेवा. त्यानंतर कापसाने नखं साफ करा. त्यामुळे नेलपॉलिश सहज निघून जाईल. 

डियोड्रंट

डियोड्रंटही नखांवरील नेलपेन्ट काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यासाठी नखांवर लावण्यात आलेल्या नेलपेन्टवर डियोड्रंट स्प्रे करा आणि लगेच कापसाने पूसून घ्या. नेलपेन्ट निघून जाईल. 

हॅन्ड सॅनिटायझर 

हॅन्ड सॅनिटायझर अनेकदा आपल्याकडे असतं. पाण्याशिवाय हात स्वच्छ करण्याचं काम हॅन्ड सॅनिटायझर करतं. याव्यतिरिक्त नखांवरील नेलपेन्ट काढून टाकण्यासाठीही हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करण्यात येतो. कापसाच्या मदतीने हॅन्ड सॅनिटायझर नखांवर लावा. त्यामुळे नखांवरील  नेलपेन्ट निघून जाण्यास मदत होईल. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स