शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

स्किन टाइपनुसार सकाळी अवश्य करा 'ही' काम; ग्लो वाढण्यासोबतच डागही करा दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 16:16 IST

बदलणाऱ्या वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. कारण आपली त्वजा फार नाजूक असते. ज्यामुळे ती लगेच डॅमेज होते. तुम्हाला ऑयली स्किन, पिंपल्स आणि ड्राय स्किन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

बदलणाऱ्या वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. कारण आपली त्वजा फार नाजूक असते. ज्यामुळे ती लगेच डॅमेज होते. तुम्हाला ऑयली स्किन, पिंपल्स आणि ड्राय स्किन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण तुम्ही योग्य काळजी घेऊन या समस्येपासून सुटका करून घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला तुमच्या स्किन टाइपनुसार, काही सोप्य टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही बदलत्या वातावरणात त्वचेची काळजी घेऊ शकता. तसेच स्किन प्रॉब्लेम्सपासून सुटका करू शकता. 

नॉर्मल स्किन

सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी सल्फेट फ्री फेसवॉशच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. त्यामुळे एक्स्ट्रा ऑइल आणि चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच त्वचेमध्ये मॉयश्चर आणि पीएच लेव्हल मेन्टेन राहण्यासाठी हलक्या टोनरचा वापर करा. याव्यतिरिक्त ड्राय पेशी हटवण्यासाठी ग्लायकोलिक अ‍ॅसिड सीरम आणि हलकं मॉयश्चरायझर यूज करा. 

ड्राई स्किन

ड्राई स्किनमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा यामुळे पिंपल्ससारख्या समस्यांचाही सामना करावा लागतो. अशातच ड्राय स्किनसाठी असे प्रॉडक्ट वापरणं गरजेचं असतं, ज्यामुळे त्वेचेमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सकाळी त्वचेवर मॉयश्चरायझर आणि टोनरचा वापर करा. याव्यतिरिक्त त्वचेमधील कोलेजन तुटण्यापासून वाचवण्यासाठी व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट सीरमचा वापर करा. 

ऑयली स्किन

जर तुमची स्किन ऑयली असेल तर सकाळी क्लिंजिंग ऑइलच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर टोनरच्या मदतीने त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेमध्ये असलेलं एक्स्ट्रा ऑइल निघून जातं. तसेच असं मॉयश्चराझर वापरा ज्यामध्ये सोडिअम पीसीए आणि ग्लिसरीनचे प्रमाण अधिक असेल. याव्यतिरिक्त त्वचेवर झिंक ऑक्साइड सनस्क्रिन लोशनचा वापर करा. 

खूप पाणी प्या

सकाळी दोन ग्लास पाण्याऐवजी दिवसभरामध्ये 7 ते 8 ग्लास पाणी प्या. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध एकत्र करून पिऊ शकता. यामुळे बॉडी आणि त्वचेमध्ये असलेले विषारी टॉक्सिन्स निघून जातील आणि त्वचेचा ग्लो वाढेल. याव्यतिरिक्त तुम्ही ग्रीन टी किंवा नारळाचं पाणीही पिऊ शकता. 

मॉयश्चरायझर, टोनर आणि सनस्क्रिन 

सूर्याची यूवी किरणं त्वचेचा टेक्चर खराब करतात. यापासून बचाव करण्यासाठी सनस्क्रिन व्यतिरिक्त मॉयश्चरायझर आणि टोनर लावणं अत्यंत आवश्यक असतं. यामुळे तुम्ही स्किन कॅन्सरपासूनही बचाव करू शकता. पण या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करण्याआधी तुमचा स्किन टाइप जाणून घेणं अत्यंत आवश्यक असतं. 

त्वचेची काळजी घेण्यासाठी इतर टिप्स : 

- जर तुम्हाला वेळेआधीच वाडत्या वयाची लक्षणं दिसू लागली तर सीरमचा टोनिंग रूटिनमध्ये समावेश करा. 

- सीरम अप्लाय केल्यानंतर मॉयश्चरायझर आणि सनस्क्रिन क्रिम लावा.

- घरातून बाहेर गेल्यानंतर कमीत कमी अर्ध्या तास आधी सनसक्रीन लावा आणि प्रत्येक 2 ते 3 तासांनी वापर करा. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स