शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बाकी काही असो - नसो पण पुरूषांनी बाथरूममध्ये आवर्जुन ठेवावी तुरटी, फायदे इतके की विचारही केला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:47 IST

Alum Benefits For Men : खासकरून पुरूषांना आपल्या बाथरूममध्ये तुरटी का ठेवावी आणि तिचा कसा कसा वापर करू शकता हे माहीत असलं पाहिजे.

Alum Benefits For Men : आपण पाहतो की, सलूनमध्ये शेव्हिंग केल्यानंतर आजही अनेकजण चेहऱ्यावर तुरटी फिरवतात. पूर्वी आफ्टर शेव्ह म्हणून तुरटीचा वापर खूप व्हायचा. अलिकडे तो जरा कमी झालाय. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, महागडे आफ्टर शेव्ह वापरण्यापेक्षा नॅचरल तुरटी कधीही चांगली. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे तुरटीचा वापर केवळ आफ्टर शेव्ह म्हणून नाही तर इतरही अनेक समस्या दूर करण्यासाठी करता येतो. अशात खासकरून पुरूषांना आपल्या बाथरूममध्ये तुरटी का ठेवावी आणि तिचा कसा कसा वापर करू शकता हे माहीत असलं पाहिजे. असं केलं तर आपले बरेच पैसेही वाचतील आणि आपल्या अनेक समस्या स्वस्तात दूर होतील. 

तुरटीचे फायदे

नॅचरल आफ्टर शेव

शेव्हिंग केल्यानंतर तुम्ही तुरटीचा वापर आफ्टर शेव्ह म्हणून करू शकता. दाढी करताना झालेली जखम याने लगेच भरून निघते आणि त्वचाही चांगली होते. तुरटीने त्वचेवरील धूळ - माती निघून जाते आणि त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात. यामुळे चेहरा आणखी खुलून दिसतो.  

घामाची दुर्गंधी 

घामाची दुर्गंधी ही उन्हाळ्यात फारच वैताग देते. आपल्याला स्वत:ला तर त्रास होतोच, आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही होतो. लोक आपल्यापासून दूर पळू लागतात. डीओ किंवा परफ्यूम लावूनही या दिवसात घामाची दुर्गंधी येतेच येते. अशात तुरटी आपली मदत करू शकते. आंघोळ करताना तुरटी पाण्यात भिजवून फक्त काखेत फिरवा. या उपायाने कितीही घाम आला तरी घामाची दुर्गंधी मात्र येणार नाही. कारण दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया तुरटीने नष्ट होतात. 

तोंडाची दुर्गंधी

जशी घामाची दुर्गंधी मोठी समस्या आहे, तशीच तोंडाची दुर्गंधी देखील आहे. ही समस्या सुद्धा तुरटीच्या मदतीने दूर होऊ शकते. चिमूटभर तुरटी पावडर आणि काळं मीठ एक ग्लास पाण्यात टाका. या पाण्याने दिवसातून दोन वेळा गुरळा करा. याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर होईल.

नॅचरल टोनर, सूज कमी करतं

तुरटी त्वचेला टोन करण्याचं काम करते. याने त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात. ज्यामुळे चेहराही स्वच्छ आणि तजेलदार दिसू लागतो. बाजारातील केमिकलयुक्त टोनरचा वापर करण्याऐवजी तुरटी कधीही बेस्ट ठरते. कारण याने काहीच साइड इफेक्ट्स होत नाहीत. तसेच याने चेहऱ्यावरील सूज आणि पुरळही दूर होते.

डार्क सर्कल

डार्क सर्कल काय फक्त महिलांनाच होतात असं नाही. पुरूषांना देखील ही समस्या होते. झोप पूर्ण न झाल्याने अनेकदा डोळ्यांखाली काळे डाग दिसतात. हे डाग दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. यासाठी थोडं तुरटी पावडर पाण्यात मिक्स करू डागांवर लावा. काही वेळाने चेहरा पाण्याने धुवून घ्या. डार्क सर्कल कमी झालेले दिसतील. फक्त डोळ्यात तुरटी जाऊ नये याची काळजी घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Alum: Men Must Keep This in Bathroom for Amazing Benefits

Web Summary : Alum offers natural aftershave, eliminates sweat and mouth odor, acts as a skin toner, reduces swelling, and fades dark circles. A cost-effective solution for men's grooming.
टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स