असे बनवा पिकनीक सलाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 21:17 IST
आपल्याला पिकनिकला जायाचे असेल तर त्यासाठी सलाड हे खूप आवश्यक आहे.
असे बनवा पिकनीक सलाड
----------------------------------------------------------------हे सलाड थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. तर पिकनिकला जाण्याच्या वेळेला पिकनिक बास्केटमध्ये ते ठेवणे आवश्यक आहे. हे सलाड बनविण्यासाठी लागणाºया साहित्याची ही माहिती आपण पाहणार आहोत.साहित्य : दही कप, मॅयोनीज दोन मोठे चमचे, पेस्ट केलेला लसण एक छोटा चमचा, गाजर व काकडी एक, पिवळी, हिरवी शिमला मिरची एक छोटा चमचा, आवश्यकतेनुसार मीठ, पांढरी मिरची १/४ छोटा चमचे हे आवश्यक आहे. याकरिता गाजर , काकडी हिरवी शिमला मिरची लांबी पतली कापावी.मॅयोनीज, लसण पेस्ट व मीठाला एका भांड्यात मिक्स करुन हलवावे. प्लॉस्टीकच्या ग्लासामध्ये या मिश्रणाचे चार भाग करावे. कापलेले सलाड यामध्ये टाकावे. ते थंड होण्यासाठी फ्रिजमधील एका डब्यात पॅक करुन ठेवावे. पिकनिकला निघातांना सलाड पिकनिक बास्केटमध्ये ठेवावे.