शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
4
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
5
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
6
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
7
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
8
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
9
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
10
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
11
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
12
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
13
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
14
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
15
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
16
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
17
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं
18
सौदीत जाऊन योगी आदित्यनाथांबद्दल आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट, अखेर तावडीत सापडलाच
19
म्हणून त्याला किंग खान म्हणतात! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला ड्रेसमुळे चालताच येईना, शाहरुखची 'ती' कृती प्रेक्षकांना भावली
20
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'

Madhuri Dixit’s beauty secrets : ५० व्या पदार्पण करुनही माधुरी दीक्षितचे सौंदर्य जैसे थे, जाणून घ्या रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2017 17:15 IST

काय आहे माधुरीच्या सौंदर्याचे रहस्य, जाणून घेण्यासाठी क्लिक करा...!

-Ravindra Moreबॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित एक अशी अभिनेत्री आहे, जिला विसरणे आजही लोकांना कठीण झाले आहे. तिने आपला अभिनय आणि सौंदर्याने कित्येक लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तिची स्माइल, तिचा डान्स, तिच्या डोळ्याचे हावभाव याची प्रशंसा केली तेवढी कमी आहे. विशेष म्हणजे तिच्या या गुणांबरोबर तिचे सौंदर्य आजही म्हणजे ५० व्या वर्षात पदार्पण करुनही जैसे थे आहे. आजही माधुरीने स्वत:ला मेंटेन ठेवले आहे. तिच्या चेहऱ्यावर अजूनही तिच चकाकी असून डोळ्यांची चमकदेखील कमी झाली नाही. * माधुरी कशी घेते स्वत:ची काळजी !संतुलित दिनचर्या आणि काही चांगल्या सवयी हेच माधुरीच्या सौंदर्याचे आणि सुदृढ शरीराचे गुपित आहे. ती कधीही धुम्रपान आणि मद्यपान करीत नाही. ती आहार आणि व्यायामावर विशेष लक्ष देते. ती एका आठवड्यात किमान सहा दिवस तरी व्यायाम करते आणि डान्स हा तिचा वर्क आउटचा महत्त्वाचा भाग आहे. तिचे असे म्हणणे आहे की, डान्स केल्याने तिला जो आनंद मिळतो तो दुसरे काही केल्याने अजिबात मिळत नाही. ती मल्टि विटॅमिन्सलाही महत्त्व देते मात्र, जर संतुलित आहार असेल तर याची गरज नाही. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी ती दर दिवशी आपला चेहरा एका क्लिन्झरने धुते आणि त्यानंतर एक सीरमचा वापर करते. कधी-कधी त्वचेच्या आवश्यकतेनुसार टोनरचा वापर करते. ती मॉइश्चरायझरवरही भर देते. शिवाय सौंदर्य टिकविण्यासाठी ती रात्री कधी उशिरा जागत नाही, वेळेवर झोपते. यामुळे ती सकाळी फे्रश फिल करते. हे देखील चांगल्या सौंदर्याचे गुपित आहे. विशेष म्हणजे ती आपल्या केसांची काळजी घरगुती उपायांनीच घेते. ती केसांना धुण्याअगोदर आॅलिव्ह तेल आणि एरंडेल तेल समप्रमाणात एकत्र करुन आपल्या केसांना लावते. यामुळे केस मजबूत होतात, ज्यामुळे केसांवर कोणत्याही ऋुतूत परिणाम होत नाही. केसांची काळजी घेण्यासाठी ती कंडिशनिंगलाही महत्त्व देते. ती केळ किंवा अन्य फळांपासून बनविलेल्या कंडिशनरचा वापर करते. Also Read : ​Beauty Tips : ​प्रियांका चोप्राने ‘या’ घरगुती उपायांनी मिळविली सुंदर त्वचा !                   : ​​ट्विंकल खन्नाने सांगितले स्वत:ला फ्रेश ठेवण्याचे रहस्य !