शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

​विटॅमिन ‘डी’चा अभाव ! आजाराला आमंत्रण !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 13:31 IST

सजीवांचे आरोग्य सुदृढ राहावे, म्हणून विटॅमिन्स म्हणजेच जीवनसत्त्वांची महत्त्वाची भूमिका असते.

रवींद्र मोरे सजीवांचे आरोग्य सुदृढ राहावे, म्हणून विटॅमिन्स म्हणजेच जीवनसत्त्वांची महत्त्वाची भूमिका असते. वेगवेगळे विटॅमिन्स आपल्या शरीरात वेगवेगळे कार्यांच्या माध्यमातून आपली मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता वाढवित असतात. त्यातीलच एक महत्त्वाचे विटॅमिन ‘डी’ होय. एका नव्या संशोधनामुळे विटॅमिन ‘डी’च्या अभावाने आपल्या शरीरावर कोणता परिणाम होतो, सध्या भारतीय नागरिकांची विटॅमिन ‘डी’ अभावी काय स्थिती आहे, हे आज आपण ‘सीएनएक्स’च्या माध्यमातून जाणून घेऊया....विटॅमिन ‘डी’चा अभाव, मोठी समस्याभारतात पूरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश असूनही विटॅमिन ‘डी’च्या कमतरतेने मोठी समस्या निर्माण होताना दिसत आहे. विटॅमिन ‘डी’च्या अभावाने केलेल्या अभ्यासात एक खूलासा झाला आहे की, सुमारे ६५-७० टक्के भारतीयांमध्ये विटॅमिन ‘डी’ची कमी आहे आणि अन्य १५ टक्के लोकांमध्ये विटॅमिन ‘डी’ आवश्यक प्रमाणात नाही. सोबत अशी सावधानता बाळगायला लावली आहे की, जर योग्य प्रमाणात त्याचे प्रबंधन केले नाही तर, रिकेट्स, ओस्टियोपोरोसिस, कार्डियोवैस्क्यूलर सारखे आजार, तसेच डायबिटीज, कॅन्सर यासारख्या संक्रमणासारखा ट्युबरक्यूलोसिस होण्याची संभावना अधिक वाढते. विटॅमिन ‘डी’ अत्यावश्यक पोषक तत्त्वविटॅमिन ‘डी’ एक अत्यावश्यक पोषक तत्त्व आहे, जे कॅल्शियमचे अवशोषण आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. सूर्य प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर हे तत्त्व त्वचेत संश्लेषित होते. हे स्टेरॉयड हॉर्मोन आहे जे शरीरात काल्पनिक रुपात प्रत्येक कोशिकाला प्रभावित करते, आणि आपल्या आरोग्याला सुदृढ ठेवण्याचे हेच महत्त्वाचे कारण आहे. विटॅमिन ‘डी’च्या अभावाने भयंकर रोगांचा प्रादुर्भावसुप्रसिद्ध अमेरिकी इंडोक्र ाइनोलॉजिस्ट आणि विटामीन ‘डी’ उपचारावरील वैश्विक प्राधिकारी डॉ. मायकेल होलिक यांनी सांगितले की, ‘विटॅमिन डी च्या कमतरतेने फक्त पश्चिमी देशच नव्हे तर भारतीय उपमहाद्वीप मध्येही चिंताजनक स्थिती आहे, जेथे सूर्य प्रकाश पूरेशा प्रमाणात आहे. येथेही पाहण्यात आले आहे की, विटॅमिन ‘डी’ च्या अधिक  कमतरतेने डायबिटीज, कोरोनरी, ह्रदयाचे आरोग्य, उच्च रक्तदाब आणि अन्य कार्डियोवैस्क्यूलर सारख्या आजारांचा धोका वाढतो.’ कैडिला फार्मास्यूटिकल्स लिमिटेड द्वारा नवी दिल्ली मध्ये आयोजित आंतरराष्टÑीय व्याख्यान कार्यक्रमात, डॉ. होलिक विटॅमिन ‘डी’ उपचार प्रबंधनात सध्याची प्रगती’ विषयावर बोलत होते. १७ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या या कार्यक्रमात २५० पेक्षा जास्त कन्सल्टंट, फिजीशियन्स, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, हाड रोग विशेषज्ज्ञ, ह्रदयरोग तज्ज्ञ आणि इंडोक्राइनोलॉजिस्ट्स यांचा सहभाग होता. इंडोक्राइनोलॉजिस्टचे प्रमुख तथा भारतीय अस्थि तथा खनिज शोध सोसायटीचे माजी अतिरिक्त निदेशक तथा प्रमुख आणि अध्यक्ष, सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ. रमन के. मारवा हे म्हटले की, ‘आम्ही  ११-१५ वयोगटातील समुहाच्या भारतीय मुलांवर दोन मुख्य संशोधन केले आहे, ज्यांना ओस्टियोपोरोसिस इंटरनॅशनल अ‍ॅण्ड ब्रिटीश जर्नल आॅफ डर्मेटॉलॉजी’मध्ये प्रकाशित केले आहे. संशोधनात असे आढळून आले की, उन्हाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूत ३० दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी ३० मिनीटापर्यंत सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहूनही ते विटॅमिन ‘डी’च्या त्या स्तरापर्यंत पोहचू शकले नाहीत, जे की स्वास्थ हाडांसाठी पर्याप्त मानले जाते. दिल्लीच्या ८० टक्यांपेक्षा जास्त नागरिकांमध्ये विटॅमिन ‘डी’ चा स्तर सामान्यपेक्षा कमी आहे. विटॅमिन ‘डी’चा अभाव आणि कमी मात्रात कॅल्शियमचे सेवनाने ओस्टियोपोरोसिस, हाड द्रव्यमान, पेशीय क मजोरी यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. किशोरावस्थेत मिळालेल्या पर्याप्त विटॅमिन ‘डी’ मुळे जीवनाच्या परिवर्तनशील अवस्थेत ओस्टियोपोरोसिसची जोखिम कमी होते. फेडरेशन आॅफ आॅब्स्टेट्रिक अ‍ॅण्ड गायन्कोलॉजिकल सोसायटीज आॅफ इंडियाच्या माजी अध्यक्षा तथा आॅब्जिंसचे आंतरराष्टÑीय संगठन, फिगोचे अ‍ॅम्बेसडर डॉ. हेमा दिवाकर यांनी सांगितले की, ‘विटॅमिन डीचा अभाव आपल्यासाठी एक अन्य आजार आहे, ज्याचे सुमारे ८० टक्यांपेक्षा जास्त प्रकरण महिलांमध्ये आढळून आले, आणि मासिकपाळीच्या स्थितीतही समान संख्येत पाहावयास मिळाले. सर्व वयोगटातील महिलांसाठी सप्लीमेंटच्या रुपात विटॅमिन ‘डी’ देण्याची प्रवृत्ती नुकतीच आॅब्जिंसमध्ये पाहण्यात आली. संशोधनात असे आढळून आले आहे की, पेशीय-तंत्रिका दुखण्याचा अनुभव असणाºया रुग्णांपैकी ९३ टक्के रुग्णांत विटॅमिन ‘डी’चा अभाव असतो. विटॅमिन ‘डी’ च्या अभावाने हाडांना नुकसान होते, ज्यामुळे हाडे ठिसुळ आणि कमकुवत होतात. मात्र विटॅमिन ‘डी’ शरीरातील योग्य प्रमाण ह्रदय, मेंदू, प्रतिकार शक्ती यासाठी महत्त्वपूर्ण आहे. लहान मुले, गर्भवती महिला व वृद्धांना जास्त धोकाशहरी आणि ग्रामीण भागात विटॅमिन ‘डी’ च्या अभावाची समस्या पाहावयास मिळू शकते. त्याचबरोबर प्रत्येक सामाजिक, आर्थिक वर्ग तसेच भौगोलिक क्षेत्रातदेखील पाहावयास मिळू शकते. लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्ति यांच्यात विटॅमिन ‘डी’च्या अभावाचा जास्त धोका आहे, असेही संशोधनातून आढळून आले आहे.