(Image Credit : barefootchiropractic.com)
जपानच्या ऑफिसेसमध्ये महिलांना हाय हील्स वापरणे अनिवार्य केले आहे. त्यानंतर याचा विरोध करण्यासाठी अभिनेत्री आणि लेखिका युमी इशिकावाने #KuToo हे अभियान सुरू केलं आहे. हाय हील्सला विरोध करण्यासाठी जपानमधील एका महिलांच्या समूहाने सरकारसमोर एक पिटिशन सादर केली.
लैंगिक भेदभावाचा मुद्दा
या पिटिशनमध्ये सांगण्यात आलं आहे की, महिलांना हाय हील्स घालण्यासाठी भाग पाडणाऱ्या लोकांवर बंदी घालणारा कायदा सरकारने आणायला हवा. हे प्रकरण लैंगिक भेदभाव आणि शोषण यात येतं. यावर जपानचं सरकार काय निर्णय घेतं हे नंतर बघू, पण आम्ही तुम्हाला हाय हील्स घालण्याचे नुकसान सांगणार आहोत.
गुडघ्याची समस्या
जेव्हा तुम्ही हाय हील्स घालून सरळ चालत असता तेव्हा तुमचे पाय सामान्यपणे रोटेट होत नाहीत. तसेच हाय हील्समध्ये शॉप अब्जॉर्बशन नसतं त्यामुळे गुडघ्यांवर अधिक दबाव पडतो आणि हळूहळू तुम्हाला गुडघ्याची समस्या होऊ लागते.
लोअर बॅक पेन
हाय हील्समुळे तुम्हाला लोअर बॅक पेनची समस्याही होऊ शकते. हील्स घालून चालल्याने वजनाची योग्य विभागणी होत नाही. त्यामुळे पाठीवर आणि कंबरेवर अधिक दबाव पडतो. अशात तुम्हाला लोअर बॅक पेनची समस्या होऊ शकते.
पाय आणि तळव्यांचं दुखणं
जर तुम्ही रोज ऑफिसला जाताना हील्सचा वापर करत असाल आणि दिवसभर हील्स घालून राहत असाल तर तुम्हाला मोठी समस्या होऊ शकते. रोज हील्स घातल्याने तुम्हाला पाय आणि तळव्यांमध्ये वेदना होऊ शकतात.
वॅरिकोज व्हेन्स आजार
हाय हील्समुळे वॅरिकोज व्हेन्स हा पायांचा आजार होतो. या आजारात पायांच्या नसांमध्ये सूज येते. साधारण ७ टक्के तरूणी या आजाराने ग्रस्त आहेत. जेव्हा खालच्या अंगांचे व्हॉल्व कमजोर होतात, तेव्हा वॅरिकोज नसा सूजतात. ही समस्या हाय हील्स आणि टाइट जीन्स घातल्यानेही होते.