शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

फक्त खाण्यासाठी नाही तर केसांसाठीसुद्धा फायदेशीर मायोनीज, जाणून घ्या वापर कसा कराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 16:53 IST

आपल्या केसांशी निगडीत असणारी एक गोष्ट म्हणजे  केस हे कधीच एकसारखे नसतात तसंच आपल्याला हवे तसे केस कधीत नसतात.

आपल्या केसांशी निगडीत असणारी एक गोष्ट म्हणजे  केस हे कधीच एकसारखे नसतात तसंच आपल्याला हवे तसे केस कधीत नसतात. कारण बदलते वातावरण आणि दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदुषण यांमुळे आपली त्वचा तसेच केस  खूप खराब होत जातात. केसांमध्ये कोंडा होणे,  केस गळणे तसंच खाज येणे अशा वेगवेगळ्या समस्या दैनंदीन जीवनात येत असतात.  जर तुम्हाला सुद्धा या  समस्यांचा सामना करावा लागत असेल तर ज्या मायोनीजचा वापर तुम्ही सॅण्डवीचमध्ये खाण्यासाठी करता त्याच मायोनीजचा वापर केसांसाठी केलात तर फायदेशीर ठरेल. चला तर मग जाणून घेऊया केसांच्या समस्येपासून वाचण्यासाठी कसा करायचा मायोनिजचा वापर.

सर्वसाधारणपणे केसांना फाटे फुटणे म्हणजेच केस दोन भागांमध्ये विभागले जातात. त्यामुळेच केस गळण्याची समस्या वाढते. जर तुम्ही दुभंगलेल्या केसांकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला केस कापावे लागू शकतात. मायोंनीजचे केसांना अनेक  फायदे आहेत. मायोनीजमध्ये केसांना  आवश्यक असणारे पोषक घटक असतात. तसंच  केसांना फाटे फुटले असतील. तर मायोनीजचा वापर फायदेशीर ठरतो. केसांना मजबूती मिळण्यासाठी तसंच केसांना गळण्यापासून रोखण्यासाठी मायोनीजचा वापर करू  शकता.

मेयोनीज आणि एलोवेरा जेलचा वापर करून तुम्ही केसांसाठी उपयुक्त असणारा हेअरमास्क तयार  करू शकता. त्यासाठी १ चमचा एलोवेरा जेल मध्ये ३ चमचे मायोनिज घाला आणि  हे मिश्रण केसांना लावा आणि एका तासासाठी सोडून द्या. त्यानंतर केसांना शॅम्पू लावून केस धुवून टाका. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.

मायोनीज आणि बदामाचं तेल मिक्स करुन  लावल्याने केस सॉफ्ट राहतात. त्यासाठी मास्क तयार करण्यासाठी  मायोनीज आणि बदामाचं तेल आणि त्यात ३ अंडी मिक्स करा. आणि हे मिश्रण केसांना लावा. त्यानंतर एक तासाने केस शॅम्पूने धुऊन टाका. असे केल्यास फरक दिसून येईल. तसंच फाटे असणारे केस व्यवस्थीत दिसायला लागतील. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स