सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. महागड्या क्रिम्स घेण्यापासून घरगुती वापराच्या वस्तूंपासून रंग उजळण्यासाठी महिला या प्रयोग करत असतात. पण घरगुती वापरात असलेल्या गुळाचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? गूळ हा आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी सुध्दा उपयुक्त ठरतो. गुळाचे सेवन सर्वाधिक केल्याने त्वचेच्या सौंदर्यात भर पडते. चला तर मग जाणून घेऊया त्वचेच्या दृष्टीने गुळ कसा उपयुक्त ठरतो.
गुळ हा केसांना दाट आणि सुंदर बनवण्यासाठी फायदेशीर ठरतो. केसांना लावण्यासाठी गुळात मुलतानी माती आणि दही तसेच पाणि मिसळून हेअर पॅक तयार करा. हा पॅक केस धुवायच्या एक तास आधी केसांना लावा. त्यानंतर केस धुवा. त्यामुळे केस चमकदार होतील. जसजसे वय वाढत जातं. तसतसे चेहऱ्यावर सुरकुत्या यायला सुरूवात होते. गुळात अॅन्टी ऑक्सीडंटस असतात. जे चेहऱ्यावर येणाऱ्या फ्री रॅडीकल्सशी सामना करतात.
रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते. गुळाचा पॅक तयार करून तो पॅक सुध्दा तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. एक चमचा गुळात एक चमचा टॉमॅटोचा रस, अर्था चमचा लिंबाचा रस, आणि चिमूटभर हळद आणि ग्रीन टी मिसळून पॅक बनवून घ्या. आणि तो पॅक चेहऱ्याला लावा. या पॅकचा वापर केल्यास फरक दिसून येईल.
त्याशिवाय गुळ आणि काळ्या तिळाचे लाडू खाल्ल्याने हिवाळ्यात दमा आणि सर्दीचा त्रास होत नाही. नियमित गुळाचे सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी नियमित गुळाचे सेवन केले पाहिजे. यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्वचेवर तेज राहते. मासिक पाळीच्यावेळी तीळ-गूळ खाल्ल्याने पोट दुखणे कमी होते. पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं.