कशी दिसेल नर्गिस...नऊवारी साडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 15:28 IST
हॉट अदाने चित्रपटसृष्टीत फेमस झालेली नर्गिस फाकरी चक्क नऊवारी साडीत दिसणार आहे...वाचून वाटले ना आश्चर्य. हो, हे खरं आहे. ती तिच्या आगामी ‘बेंजो’ या चित्रपटात चक्क नऊवारी साडी नेसणार आहे.
कशी दिसेल नर्गिस...नऊवारी साडीत
हॉट अदाने चित्रपटसृष्टीत फेमस झालेली नर्गिस फाकरी चक्क नऊवारी साडीत दिसणार आहे...वाचून वाटले ना आश्चर्य. हो, हे खरं आहे. ती तिच्या आगामी ‘बेंजो’ या चित्रपटात चक्क नऊवारी साडी नेसणार आहे. photo source : wallpaper.localadress.inमूळची अमेरिकेची असलेल्या नर्गिसने बॉलीवूडमध्ये २०११ मध्ये एंन्ट्री केली. वेस्टर्न वरून नर्गिस चक्क आता मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.नर्गिससह सिनेमात रितेश देशमुखही प्रमुख भूमिकेत असणार आहे. यावेळी बॉलीवूडच्या चित्रपटात पहिल्यांदाच रितेश महाराष्ट्रीयन मुलाची भूमिका साकारणार आहे.एका सीनमध्ये रितेश नर्गिसला नऊवारी साडीत स्वत:ची पत्नी म्हणून कल्पना करतो, त्या सीनमध्ये नर्गिस नऊवारीत दिसणार आहे.नर्गिसची ही नऊवारी साडी दिव्या गंभीरने डिझाईन केली आहे. ही साडी नेसायला नर्गिसला चक्क २ तास लागले.दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांगितले की, ‘मी माज्या चित्रपटांमध्ये कायम एक मराठी अंदाज ठेवतो आणि तेच मी बेंजोमध्ये देखील केले. माज्या मते प्रत्येकाला महाराष्ट्राची संस्कृती पहायला मिळाली पाहिजे. नर्गिस नऊवारी साडीत अतिशय मोहक आणि सुंदर दिसतेय.’