शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केसगळती थांबेल, केस वाढतीलही खूप; फक्त तुरटीचा 'असा' करा वापर, महागडी प्राॅडक्ट्स विसराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 17:54 IST

Alum for Hair Care : आजकाल जास्तीत जास्त लोकांना केसगळती, केसात कोंडा होणे, केस पातळ होणे किंवा तुटणे अशा समस्या होतात. या सगळ्या समस्या तुरटीच्या मदतीनं दूर करू शकता.

Alum for Hair Care :  तुरटी तुम्ही त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासोबतच केसांच्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा करू शकता. पण अनेकांना यासाठी तुरटी कशी वापरावी हेच माहीत नसतं. आजकाल जास्तीत जास्त लोकांना केसगळती, केसात कोंडा होणे, केस पातळ होणे किंवा तुटणे अशा समस्या होतात. या सगळ्या समस्या तुरटीच्या मदतीनं दूर करू शकता. यासाठी तुरटी कशी वापरावी हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यातील सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इतर केमिकलसारखे तुरटीचे केसांवर काहीच दुष्परिणाम होत नाहीत.

केसांची वाढ झरझर होईल

तुमच्या केसांची वाढ खुंटली असेल आणि केस वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला फायदा मिळाला नसेल तर एकदा तुरटीचा उपाय करून बघा. यासाठी तुरटीचं पावडर घ्या आणि खोबऱ्याच्या तेलात ते मिक्स करून केसांवर लावा. या तेलानं डोक्याच्या त्वचेवर हलक्या हातानं मालिश करा. रात्रभर हे तेल केसांना असंच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस शाम्पूने धुवा. काही दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला फरक दिसून येईल. 

पांढरे केस काळे करण्यासाठी...

बऱ्याच लोकांचे आजकाल कमी वयातच केस पांढरे होतात. केस पुन्हा नॅचरली काळे करण्यासाठी तुरटी फायदेशीर ठरते. उपाय करण्यासाठी तुरटीचं पावडर कलौंजीच्या तेलात मिक्स करा.या तेलात तुरटी टाकून याने डोक्याच्या त्वचेची मालिश करा. असं केल्याने डोक्यात ब्लड फ्लो वाढतो आणि केसांची समस्या दूर होते. ब्लड फ्लो सुधारल्यास केसही काळे होतात.

कोंडा होईल गायब

बऱ्याच लोकांना कोणत्याही वातावरणात जास्त घाम येतो. ज्यामुळे केस चांगले स्वच्छ होत नाही. डोक्याच्या त्वचेवरही धूळ-माती जमा होते. ज्यामुळे केसांमध्ये भरपूर कोंडा होतो. अशात तुरटीचं पावडर तयार करा ते थोडं पाणी लिंबाच्या रसात टाका. याने डोक्याच्या त्वचेची मालिश करा. असं केल्याने केसांमधील कोंडा दूर होईल. 

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स