(Image credit- intheco.com)
सध्याचे व्यस्त दैनंदिन जीवन जगत असताना कोणतंही काम करायच असेल. तरी वेळेची कमतरता जाणवते. त्यामुळे ठरवलेली कामं ठरवलेल्या वेळेत होत नाही. अनेक महिला या सकाळी सकाळी केस धुतात. तर काहीजणी या सकाळी उठल्यानंतर घाई होऊ नये. म्हणून रात्रीच केस धुतात. पण रात्री केस धुतल्याने काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांमुळे त्वचेचे तसेच केसांचे नुकसान होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया रात्री केस धुतल्यास कोणत्या परीणामांना सामोरे जावे लागु शकते.
रात्री केस धुतल्याने केसांची मुळं ही कमजोर होतात. त्यामुळे केस गळायला लागतात. रात्री केस धुवून झोपल्यानंतर केसात गुंता होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे केस कंगव्याने विंचरताना मोठ्या प्रमाणात तुटतात. यामुळे केसांचे होणारे नुकसान टाळण्यसाठी केस रात्री धुणे टाळा.
तसेच शांपू, कंडिशनर, यांच्या जास्त वापराने केस कोरडे होतात. डोक्यावरील त्वचासुद्धा आजारी पडते. केसांची मुळे नष्ट होतात. केस पातळ होऊन टक्कल लवकर पडू शकते. केस लवकर पिकतात. त्यामुळे केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी रात्री केसांना आवळ्याचा रस लावावा. तसेच कच्चा कोबी, कांदा व कच्चा पालक यांचे सेवन केल्याने केस चांगले राहतात.