शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
2
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
3
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
4
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
5
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
6
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
7
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
8
GSTच्या नव्या बदलांमुळे IPL 2026ची तिकीटे महागणार; पाहा किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?
9
कोकणात भाजप-शिंदेसेनेत फोडाफोडी? कुडाळमध्ये नगराध्यक्षासह ६ नगरसेवकांचं भाजपामधून निलंबन 
10
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
11
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
12
GST On Cars: दिवाळीत कार खरेदी करणाऱ्यांना गिफ्ट; GST कपातीमुळे कोणती कार घेणं ठरणार फायदेशीर?
13
GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय?
14
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
15
Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका
16
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
17
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!
18
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
19
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
20
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी

पार्लरच्या खर्चाशिवाय सोपे उपाय वापरून नको असलेले केस घरच्याघरीच काढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 18:35 IST

लॉकडाऊनमुळे तुम्हाला पार्लरला जाता येत नसेल तर टेंशन घेण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही घरच्याघरी सुद्धा शरीरावरचे नको असलेले केस काढून टाकू शकता. 

सध्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. जास्तीत जास्त लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्यापासून वाचवता यावं. यासाठी घरी थांबण्याचं आवाहन केलं आहे. पण अनेक महिलांना आठवड्यातून एकदा तसंच काहींना पंधरा दिवसातून एकदा आपल्या त्वचेवर ग्लोईंग लूक मिळवण्यासाठी पार्लरला जायची सवय असते.  लॉकडाऊनमुळे तुम्हाला पार्लरला जाता येत नसेल तर टेंशन घेण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही घरच्याघरी सुद्धा शरीरावरचे नको असलेले केस काढून टाकू शकता. 

तुरटी आणि गुलाबपाणी

एका वाटीत दोन मोठे चमचे गुलाबपाणी घ्या, आता यामध्ये अर्धा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करा. चमच्यामध्ये सॉल्युशन घेऊन बघा आणि खात्री करून घ्या की, तुरटी व्यवस्थित मिसळली आहे की नाही, कापसाच्या मदतीने हे त्वचेवर  लावा त्यानंतर २० मिनिट ठेवा आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुवा . 

बेसन आणि हळद

हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहऱ्यावरील नको असलेले केस तर निघून जातीलच पण तुमच्या चेहऱ्यावर चमकदेखील येईल. एका वाटीत अर्ध कप बेसन घ्या, यामध्ये अर्धा कप थंड दूध मिसळा, एक चमचा ताजं क्रिम आणि हळददेखील मिसळा ,आता हे मिश्रण चेहऱ्यावर लाऊन २० मिनिटं ठेवा. हे मिश्रण सुकल्यावर हाताने काढा अथवा पाण्याने धुवा. चांगल्या परिणामांसाठी हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करा आणि नको असलेले त्वचेवरील केस हटवा.

अंड आणि पांढरा भाग

अंड तोडून त्याचा सफेद भाग एका वाटीमध्ये घ्या. यामध्ये एक चमचा साखर आणि अर्थ चमचा मक्याचं पीठ मिसळा. हे मिश्रण ब्रशच्या सहाय्याने चेहऱ्यावर केस असतील त्या ठिकाणी लावा. १०ते २०  मिनिटं हे चेहऱ्यावर सुकू द्यावं. नतंर कोणत्याही सुक्या अथवा रफ कपड्याने तुमचा चेहरा साफ करा आणि मग थंड पाण्याने धुवा.

हेअर रिमुव्हर क्रिम 

ज्या भागामधील केस काढायचे असतात त्या भागावर या क्रीमचा पातळ थर लावावा ओल्या कापडाने खालून वरच्या दिशेने ते क्रीम पुसून काढावे. त्यानंतर त्वचा धुवून कोरडी करावी. हेअर रिमुव्हल क्रीम शरीरावर कोणत्याही भागावर लावता येते.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स