शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांची  सूज कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 13:13 IST

सुंदर, टपोरे डोळे सगळ्यांनाच हवे असतात. कारण आपल्या डोळ्यांच्या आकारामुळे आपला चेहरा सुंदर दिसत असतो.

सुंदर, टपोरे डोळे सगळ्यांनाच हवे असतात. कारण आपल्या डोळ्यांच्या आकारामुळे आपला चेहरा सुंदर दिसत असतो. तसंच  डोळ्यांना सुंदर करण्यासाठी आपण वेगवेगळया प्रकारचे कॉस्मॅटिक्स वापरत असतो.  कारण बदलती जीवनशैली, आणि झोपेची कमतरता यांमुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे डोळ चांगले दिसत नाहीत. 

जर तुम्ही जास्त झोपलात किंवा काहीवेळा झोप कमी होते. अशा दोन्ही वेळेला डोळे सुजतात. त्यामुळे डोळे मोठे दिसायला लागतात. पण जर त्याचवेळी तुम्हाला कुठे पार्टीसाठी किंवा कामासाठी बाहेर पडायचं असेल तर असे डोळे असतील तर हवातसा पर्फेक्ट लूक तुम्हाला मिळणार नाही.  काही घरगुती घटकांचा वापर करून तुम्ही डोळ्यांची समस्या  सहज दूर करू शकता. 

डोळ्यांसाठी जर तुम्हाला कॉफी मास्क तयार करायचा असेल तर तुम्ही कॉफी तसंच आल्याचा रस एकत्र करुन त्याची पेस्ट मेकअप रिमुव्हर म्हणून वापर करू शकता. त्यासाठी या रसात फेसवाइप्स किंवा कापूस घालून ते आपल्या डोळ्यांना लावा. काकडीचा  वापर सुद्दा डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतो त्यासाठी  काकडीचा रस करून तो नियमितपणे डोळ्यांना लावा. शक्य नसल्यास फक्त काकडी कापून तिचे लहान  काप डोळे बंद करून  डोळ्यांवर ठेवल्यास थकवा निघून जाण्यास मदत होईल. यामुळे डोळ्यांना शांतता जाणवते. 

तसंच डोळ्यांच्या खालचे काळे डाग काढण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. त्यासाठी एक बटाटा घ्या. मधोमध कापून बटाटयाच्या आतला भाग डोळ्यांच्या खाली फिरवा त्यांमुळे डोळे चांगले  राहतील.  डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे  जास्त तयार झाली असल्यास नियमितपणे डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याचा रसाने हलक्या हाताने मालिश करा. 

दुधात पातळ कापड अथवा कापूस बुडवून त्याच्या घडया बंद डोळयांवर ठेवल्याने डोळे लाल  झाले असतील तर आराम मिळतो. त्याचप्रमाणे डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहाराचा खूप उपयोग होतो. या आहारामध्ये सर्वाधिक महत्वाचे आहे गाजर. गाजरामध्ये अ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं. त्यातून डोळ्यांना पोषक घटक मिळतात. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सeye care tipsडोळ्यांची काळजी