शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

आयब्रो करताय?; मग 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 14:55 IST

चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी भुवयांचं फार मोठं योगदान असतं. भुवया जर विचित्र प्रकारे वाढल्या तर त्यामुळे चेहरा विद्रुप दिसू लागतो. पण याच भुवया जर व्यवस्थित असतील तर मात्र चेहऱ्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं.

चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी भुवयांचं फार मोठं योगदान असतं. भुवया जर विचित्र प्रकारे वाढल्या तर त्यामुळे चेहरा विद्रुप दिसू लागतो. पण याच भुवया जर व्यवस्थित असतील तर मात्र चेहऱ्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. त्यातही जर भुवया चेहऱ्याच्या आकारानुसार नीट नसतील, जास्त मोठ्या किंवा जास्त बारिक झालेल्या असतील तरीदेखील चेहऱ्याचा लूक खराब दिसतो. त्यामुळे थ्रेडिंग करताना त्या नीट कोरणं गरजेचं असून त्यामुळे चेहऱ्याला एक अ‍ॅट्रॅक्टिव लूक मिळतो. जर तुम्हाला प्रत्येक वेळी भुवयांचा शेप परफेक्ट पाहिजे असेल तर त्या कोरताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. 

1. भुवया ब्लेंड करण्याची पद्धत

जेव्हाही तुम्ही भुवयांना आकार देत असाल किंवा त्यांवर रंग फिल करत असाल तर त्याना जास्त डार्क करू नका. कारण त्यामुळे तुमचा नॅचरल लूक बिघडण्याची शक्यता असते. पेन्सिलने भुवयांच्यामध्ये असलेल्या गॅपमध्ये अलगद स्ट्रोक करा. त्यामुळे नॅचरल लूक तसाच राहिल. 

2. या पद्धतीने करा थ्रेडिंग

जेव्हाही तुम्ही पार्लरमध्ये थ्रेडिंग करण्यासाठी जात असाल तेव्हा काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. थ्रेडिंग करताना भुवयांचे केस जास्त कोरू नका. त्याचप्रमाणे दोन्ही भुवयांच्यामध्ये जास्त गॅप ठेवू नका आणि भुवयांच्या दोन्ही टोकांवरून फक्त एक्स्ट्रा केसचं रिमूव्ह करा. असे केल्यानं तुमच्या भुवया परफेक्ट शेपमध्ये दिसतील. 

3. भुवयांसाठी असणारी आयब्रो पेन्सिल

जर तुम्ही स्वतःच भुवयांना योग्य आकार देण्याचा विचार करत असाल तर, आयब्रो पेन्सिलचा रंग निवडताना काळजी घ्या. हा रंग तुमच्या भुवयांच्या रंगाशी मिळता जुळता असला पाहिजे. जर तुम्ही रंग निवडताना कनफ्यूज असाल तर नेहमी डार्क रंगाचीच निवड करा. जर तुमच्या भुवयांच्या केसांचा रंग ब्राऊन असेल तर त्यासाठी डार्क ब्राऊन रंगाच्या आयब्रो पेन्सिलची निवड करा. त्यामुळे भुवयांचा रंग नॅचरल दिसण्यास मदत होईल.

4. मेकअपचा बेस लावल्यानंतरच आयब्रो पेन्सिलचा वापर 

मेकअप करतानाच भुवयांसाठी आयब्रो पेन्सिलचा वापर करत असाल तर, चेहऱ्यावर कंसीलर, फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करा आणि त्यानंतरच आयब्रो पेन्सिलचा वापर करा. जर पहिल्यांदा आयब्रो पेन्सिलने भुवया नीट केल्या तर फाउंडेशन किंवा कंसीलर लावताना आयब्रो पेन्सिलचा रंग पसरण्याची शक्यता असते. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHair Care Tipsकेसांची काळजी