(Image Credit : Rupini's)
आयब्रो करण्यासाठी थ्रेंडीगचा आधार अनेक महिला घेतात. पण चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पद्धतीमुळे कपाळाजवरील काही भाग सुजणे, लाल होणे अशा प्रकारचा त्रास होतो. हा त्रास जर तुम्हाला दूर करायचा असेल तर काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
थ्रेडींगने आयब्रो करण्यापूर्वी त्यांना थंड पाण्याने ओले करा. यामुळे त्याभागातील संवेदना कमी झाल्याने नम होतील. पाण्याऐवजी तुम्ही बर्फाचे क्युबदेखील फिरवू शकता.
थ्रेडींग नंतर काय करावे?
१) थ्रेडींगमुळे होणारी जळजळ, लालसरपणा, खाज कमी करण्यासाठी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. तसेच सतत चेहर्याला हात लावणे टाळा. कारण थ्रेडींगमुळे त्वचा अतिशय संवेदनशील होते.
२) थ्रेडींग केल्यानंतर त्वचेवरील हेअर फोलिक्समध्ये बॅक्टेरियांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे ब्रेकआऊटचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच कापसाच्या बोळ्यावर टोनरचे थेंब घालून चेहरा स्वच्छ करून घ्यावा. यासाठी तुम्ही सॅलिसायक्लिक अॅसिडयुक्त टोनरचा वापर करू शकता. यामुळे त्वचेला तेल मिळेल तसेच बॅक्टेरियांचा नाश होण्यासही मदत होईल.
३) त्वचेवरील जळजळ कमी करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे एखादे सौम्य मॉईश्चरायझरचा वापर. मात्र हे मॉईश्चरायझर अल्कोहल विरहित असावे. याचाही तुम्हाला फायदा होईल.
४) थ्रेडींग केल्यानंतर त्वचेवर काही महिलांना पुरळ येते. अशावेळी टी-ट्री ऑईलचा वापर करावा. कोबरेल तेल किंवा कोणत्याही बेसिक तेलामध्ये टी-ट्री ऑईलचे काही थेंब मिश्रित करा. कापसाने हे मिश्रण कपाळावर लावा. टी-ट्री ऑईलमध्ये अॅन्टीसेप्टीक आणि अॅन्टीइंफ्लामेंटरी तत्त्व असतात. लॅंवेंडर तेलाचाही वापर केल्यास त्वचेवरील त्रास कमी होतो.
५) थ्रेडींग केल्यानंतर लगेचच थेट सूर्यप्रकाशात जाऊ नका. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. अगदीच घाईत थ्रेडींग करून तुम्हांला बाहेर पडणे, फिरणे आवश्यक असेल तर चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन लोशन वापरा. उन्हाच्या तडाख्यापासून बचावण्यासाठी हॅट किंवा छत्रीचा वापर करावा.